फाळेगाव येथिल गरीबाचे घर काही क्षणात उध्वस्त.
अवकाळी पावसाचा तडाका .
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
27 एप्रिल 2023
हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका फाळेगाव परिसरामध्ये
काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कनेरगाव नाका जवळ असलेल्या फाळेगाव येथे पाळेश्वर विद्यालय जिल्हा परिषद शाळा आणि नागरिकांच्या घराचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिनांक 26 ते 30 एप्रिल पर्यंत वादळी वाऱ्यासह गारा व पावसाची इशारा दिला होता.
फाळेगाव आजूबाजूच्या परिसरा मध्ये दी. 26 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास येथील पाळेश्वर विद्यालय जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे उडून भिंत पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर गरिबांचे काही घरे क्षणात उध्वस्त झाल्याची माहिती आहे
यामध्ये मधुकर यशवंत काशिदे, लक्ष्मण नांदणकर, मोहम्मद शेख मोहम्मद रहीम या गरीब कुटुंबातील व्यक्तीचे घर पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने
त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
शासनाने तात्काळ यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी फाळेगाव येथील नुकसानग्रस्तांना मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे.
إرسال تعليق