कनेरगाव नाका येथे वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस. हळद पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
21 एप्रिल 2023
हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे तापमानात कमालीची वाढ झाल्यामुळे
आज शुक्रवारी दुपारी तीन वाजता पासून साडेतीन वाजेपर्यंत तासभर वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस प डून शेतकऱ्यांच्या हळदीचे मोठे प्रमाणात नुकसान झाले
दरम्यान
ढगांच्या गडगडाटासह परिसरात पाऊस व गारा पडल्या.गेली काही दिवस हळदीचे पीक काढणे सुरू असताना दररोज दिवसभर ऊन व संध्याकाळी हवा- सुटत असून पाणी . काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये हळद प्रक्रिया सुरू केली होती
गारा व वादळी पडल्यामुळे सर्व आकाश पिकावर पाणी पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
तसेच या महिन्यात लग्नसराई असल्याने
वऱ्हाडी मंडळाची तारेवरची कसरत करावी लागत आहे
दिवसभर ढगाळ वातावरण बदल व संध्याकाळी पाऊस पडत आहे त्यामुळे दिवसभर शेतामध्ये हळद वाळू घालत आहोत परंतु घरी गेल्यानंतर लगेच चार वाजता पाणी येत आहे घरून शेतामध्ये येईपर्यंत पाण्यामुळे हळदीचे नुकसान झाले.
कनेरगाव परिसरामध्ये मागील आठवड्यापासून गारा व वाऱ्यासह वादळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हळद व इतर पिकाचे नुकसान झालेले आहे
शासनाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे
إرسال تعليق