रमजाई ईद निमित्त उद्या हिंगोलीत वाहतुकीच्या काही रस्त्यामध्ये बदल

रमजाई ईद निमित्त उद्या  हिंगोलीत वाहतुकीच्या काही  रस्त्यामध्ये बदल

 महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
शुक्रवार21 एप्रिल 2023 

हिंगोली रमजान ईद हा सण २२ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शहरातील औंढा नागनाथ रोडवरील मुख्य इदगाह मैदान येथे मुस्लीम समाज बांधवांची नमाज अदा करण्याकरिता मोठी गर्दी होणार असल्याने रहदारीस अडथळा होण्याची. शक्यता असल्याने काही भागातील वाहतुक पुर्णपणे बंद तर वाहतुकीकरिता पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली. आहे.

शहरात रमजान ईद शनिवार २२ एप्रिल रोजी साजरी करण्यात येत आहे. रमजान ईद निमित्त औंढा नागनाथ रोडवरील मुख्य इदगाह मैदान येथे मुस्लिम समाज बांधव नमाज अदा करण्याकरिता एकत्र येतात. त्यामुळे या इदगाह मैदानावर मोठया प्रमाणात गर्दी होणार असुन त्यामुळे याठिकाणी रहदारीस अडथळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी २२ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ११ या कालावधीत शहरातील वाहतुकीच्या नियमात बदल करुन शहरातील काही भागातील वाहतुक पुर्णपणे बंद तर वाहतुकीकरिता पर्यायी मार्गाची व्यवस्था केली आहे.

हिंगोली शहरातील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या मार्गामध्ये नांदेड नाका, एनटीसी गेट, बसस्टॅण्ड पुर्वेकडिल गेट, बावनखोली रोड, संभाजी शाळेजवळील रोड येथुन इदगाहकडे
जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे.
 तसेच कयाधु नदीकडून नांदेड नाकाकडे येणाऱ्या रोडवरील वाहतुक पुर्णपणे बंद राहणार आहे. जड वाहणास बंद असलेले मार्गामध्ये नर्सी टी. पॉईंट, खटकाळी बायपास, अकोला बायपास येथून शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनास प्रवेश बंद राहील तर वाहतुकीकरिता पर्यायी मार्गामध्ये हिंगोली शहरातुन औंढा नागनाथ, सेनगावकडे जाणेकरिता वाहतुकीसाठी इंदिरा चौक- गांधी चौक- फुलमंडी-गोदावरी कॉर्नर- मेहराजउलुम मस्जीद खाकीबाबा चौक- कब्रस्तान कयाधु नदी पुल-नर्सी टी. पॉईंट पासुन पुढे जाता येणार आहे. शहरातून नांदेडकडे जाणेकरिता इंदिरा गांधी चौक- नांदेड नाका - रेल्वेगेट-खटकाळी बायपास- उमरा पाटी पासुन पुढे जाता येणार आहे. जड वाहतुक वाशिमकडून नांदेडकडे जाणेकरिता डेंन्टल कॉलेजपासुन नविन एनएच-१६१ महामार्गाने नांदेडकडे जाता येणार आहे. नर्सीकडून येणारी व नांदेडकडे जाणारे जड वाहतुक नर्सी टी. पॉईंट वरुन पुढे औंढा नागनाथ मार्गे, तसेच शहरातील आंबेडकर चौक-गांधी चौक- इंदिरा चौक-नांदेड नाका - छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता वाहतुकीसाठी सुरु राहणार आहे. रमजान ईद निमित्त वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून २२ रोजी सकाळी ८ ते ११ या कालावधीत वाहतुक मार्गात केलेल्या बदला प्रमाणे सुचना व आदेशाचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم