नागेशवाडी येथे बुद्ध जयंतीनिमित्त जागतिक किर्तीच्या बौद्ध भिकुंच्या उपस्थितीत धम्म परिषदेचे आयोजन-भिमराव हत्तीआंबीरे

नागेशवाडी येथे बुद्ध जयंतीनिमित्त जागतिक किर्तीच्या बौद्ध भिकुंच्या उपस्थितीत धम्म परिषदेचे आयोजन
भिमराव हत्तीआंबीरे

 मंगळवार24एप्रिल 2023
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क

हिंगोली 
जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील नागेश वाडी येथील संबोधी महाविहार व विपश्यना केंद्र येथे ५ मे शुक्रवार रोजी बुद्ध जयंती निमित्त जागतिक कीर्तीच्या बौद्ध भिकूंच्या उपस्थितीत सातव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे  यांनी दिली. 
संबोधी मित्र मंडळाच्या वतीने धम्मपरिषद आयोजनाबाबत हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात सोमवार दि.२४ एप्रिल रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर आयोजित धम्म परिषदे संदर्भात भीमराव हत्तीअंबीरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी म्हणते धम्मबोधि थेरो औरंगाबाद,  विजय वाकोडे बि.आर.तुपसुंदर, भगवान जगताप यांची उपस्थिती होती. 
समाज भूषण पुरस्कार प्राप्त भीमराव हत्ती आंबिरे यांचा  सत्कार करण्यात आला

यावेळी माहिती देताना हत्तीआंबीरे म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यातील नागेश वाडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सातव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे यंदा बौद्ध जयंती चे अवचित्य साधून ही जागतिक स्तरावरील बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून या धम्म परिषदेत जागतिक पातळीवर धम्माचा प्रसार- प्रचार करणारे वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिष्ट चे अध्यक्ष पोरनचाई पालधम्मो यांची उपस्थिती राहणार असून त्यांच्या समवेत देश विदेशातील जागतिक दर्जाचे बौद्ध भिकू उपस्थित राहून धम्मदेशना देणार आहेत. जगातील विविध ५० देशांमध्ये धम्माचा प्रचार प्रसार करणार्‍या वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट या संस्थेचे पदाधिकारी  या धम्म परिषदेत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, त्यामध्ये जनरल सेक्रेटरी  मिथीला चौधरी (बांगलादेश) उपाध्यक्ष सबुज बरुआ (बांगलादेश) यांची उपस्थिती राहणार आहे. याशिवाय भंते डॉ. खेमधम्मो महाथेरो यांचीही उपस्थिती राहणार आहे. जागतिक दर्जाच्या बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत ही राज्यातील पहिलेच धम्मपरिषद असून सायंकाळी ५ वाजल्यापासून विविध कार्यक्रम व धम्मदेशना होणार आहे तेव्हा या धम्म परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे मुख्य संयोजक समाज भूषण भीमराव हत्ती अंभिरे यांच्यासह भिकू आनंद, भिकू बोधीधम्मा, विजय वाकोडे, बबन शिंदे, मुरलीधर ढेंबरे, एल.आर.कांबळे,अरविंद सावते, सिद्धार्थ भराडे, भगवान जगताप ,अदिसह संबोधी मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी व  नागेशवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم