ऑटोरिक्षातील जुगाऱ्यांचा डाव उधळला चार जणांना घेतले ताब्यात सहायक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे यांची कारवाई

ऑटोरिक्षातील जुगाऱ्यांचा डाव उधळला चार जणांना घेतले ताब्यात 
 
सहायक पोलीस निरीक्षक शिवसाब  घेवारे यांची कारवाई

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
 मंगळवार25 एप्रिल 2023

हिंगोली : ऑटोरिक्षात बसून 'झन्ना मन्ना' नावाचा जुगार खेळणाऱ्या चार जणांवर कारवाई करीत पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख ७६ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई हिंगोली शहरातील नांदेड नाका भागात २४ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास करण्यात आली.

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार दररोज कुठे ना कुठे कारवाई केली जात आहे. त्यामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.

सोमवारीही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार जुगाऱ्यांवर कारवाई केली. नांदेड नाका परिसरात एका ऑटोरिक्षामध्ये झन्ना-मन्ना नावाचा केला. जुगार सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.
त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार प्रमोद थोरात, दत्ता नागरे आझम प्यारेवाले, राजानन पोकळे, गणेश लेकुळे, पायघन, खंडागळे आदींच्या पथकाने एका ऑटोरिक्षाची तपासणी केली.
यात चार जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख ६ हजार ७९० रुपये आहेत.

२० हजारांचे मोबाइल, एक ऑटो तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ७६ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त
याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून जगनाथ जयाजी तडसे (रा. माळधामणी). एकनाथ गंगाधर मुंडे (रा. हिवराबेल), शेख जाबेर शेख रहेमान (रा. मस्तानशहानगर), माणिक गणपत मुंडे (रा. हिवराबेल ) यांच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला 
पुढील तपास शहर ठाण्याचे पोलिस अंमलदार संजय मार्के करीत आहे

Post a Comment

أحدث أقدم