विजय गुंडेकर यांच्या वेदनांचे काहूर कविता संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन

 विजय गुंडेकर यांच्या वेदनांचे काहूर  कविता संग्रहाचे  मान्यवरांच्या हस्ते विमोचन 


महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
9 एप्रिल 2023 

व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा हिंगोली.च्यावतीने पदग्रहण सोहळा व पॉलिसी वाटप एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा मध्ये  दैनिक तरुण भारत चे शहर प्रतिनिधी तरुण तथा प्रेसफोटोग्राफर कवि विजय गुंडेकर यांच्या वेदनांचे काहूर या कविता संग्रहाचे विमोचन करण्यात आले.  कवि विजय गुंडेकर यांच्या पहिल्या कविता संग्रहाचे नाव काळजाचे बोल हा तर दुसरा कविता संग्रह वेदनांचे काहूर या कविता संग्रहाचे विमोचन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्हॉट्स ऑफ मीडिया चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, 
उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार, आमदार तानाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, जिल्हा प्रभारी चंद्रकांत कारभारी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी,  भाजपा जिल्हाध्यक्ष रामराम वडकुते, रामदास पाटील सुमठाणकर, शिवसेना जिल्हा प्रमुख विनायक भिसे, जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, कृष्णा पाटील जरोडैकर, विजय चोरडिया, डॉ.विजय निलावार, वसंत पाटील, व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा रमेश कदम, जिल्हा सरचिटणीस रमेश चेंडके, तरुण भारत चे जिल्हा प्रतिनिधी संजय कुलकर्णी, यांच्या उपस्थितीत वेदनांचे काहूर या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश कदम यांनी केले.तर  सूत्रसंचालन प्रा.संध्या रंभारी कदम यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم