वादळी वाऱ्यासह कनेरगाव नाका परिसरात गारांचा पाऊस. हळद पिकाचे मोठे नुकसान
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
रविवार 9 एप्रिल 2023
कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे दिनांक ९ एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ठीक पावणेसहा वाजता वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला
मागील काही दिवसांपासून वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे तापमानात वाढ झाली होती
दरम्यान ऊन- पाऊस आभाळ, वारा असे वातावरणात बदल होत असताना आज अचानक ढगांच्या गडगडाटासह व वादळ वाऱ्यासह बोरा च्या आकाराच्या गारा व पाऊस अर्धा ते एक तास वादळी पावसाने झोडपले
....अचानक पाऊस व गारा झाल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये पूर्ण धावपळ झाली
हिंगोली वाशिम मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्यांची वाहन चालक का सह नागरिकांची धांदल एकच उडाली.
दिवसापासून कनेरगाव परिसरामध्ये हळदीचे पीक काढणे सुरू आहे अशातच या गारा व पावसामुळे शेतकरी वर्ग आता हवालदील झाला आहे. दिवसभर वातावरण बदल झाल्याने वादळी वाऱ्यासह गारा पडल्यामुळे वातावरणात आता गारवा निर्माण झाला आहे.
कनेरगाव नाका परिसरात
वादळी वाऱ्यासह पाऊस व गारामुळे
काही तास वीज पुरवठा खंडित झाला होता
إرسال تعليق