जलजीवन मिशन अंतर्गत होत् असलेल्या योजनेमुळे कनेरगाव नाका येथील पाणीटंचाई कायम दूर होणार.....!

जलजीवन मिशन अंतर्गत होत् असलेल्या   योजनेमुळे कनेरगाव नाका येथील पाणीटंचाई   कायम दूर होणार

 प्रतिनिधी सुधाकर डुकरे 
रविवार 9 एप्रिल 2023 

कनेरगाव नाका  : गावकऱ्यांना स्वच्छ पुरेसे पाणी नियमित मिळावे म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत नव्या विहिरीला मंजुरी मिळाली असून या विहिरीच्या कामाला दी. 7 एप्रिल 2023 शुक्रवार रोजी सुरुवात झाली. त्याचबरोबर कनेरगाव ग्रुप ग्रामपंचायत मधील मोप येथे सुद्धा काही दिवसांपूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीला मंजुरी मिळून विहिरीचे काम चालू झाले आहे. कनेरगाव वासियांचे उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी होणारी भटकंती आता थांबणार आहे. कनेरगाव नाका येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी म्हणून ग्रामपंचायत च्या वतीने  प्रशासनाकडून नवीन विहीर, पाणी साठवण टाकी, व पाईपलाईन गरजेनुसार वाढीव लोकसंख्या व वाढीव वस्तीकरिता मंजूर करून घेतली या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.यावेळी सरपंच सौ स्वाती गणेश गावंडे उपसरपंच निलेश दहात्रे यांची उपस्थिती होती. गावातील लोकांना मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळावे म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत नवीन विहीर, पाण्याची टाकी, पाईपलाईन मंजूर करण्याची मागणी ग्रामपंचायत कडून करण्यात आली होती यावेळी सरपंच स्वाती गावंडे, उपसरपंच निलेश दहात्रे, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर मलवाड , माजी प. स. सभापति बालाजी गावंडे तसेच ग्रामपंचायत सदस्य निर्मलाताई सोळंके ,अनिताताई  बियाणी, मनोज सोळंके, बालाजी गावंडे ,गणेश गावंडे, रामचंद्र पाटील , गजानन गावंडे, राज गावंडे, किशोर सहतोंडे, भिकुलालजी बियाणी, शेख रहीम, कांबळे,देवराव घुगे, सुरेश गावंडे, आदीसह गावातील नागरिक उपस्थित होते. ग्रामपंचायत ने केलेल्या या कार्याचे कौतुक कनेरगावातील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم