हिंगोली जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव सुरु

जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव सुरु 
जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
27 एप्रिल 2023
हिंगोली 
 येथील लिंबाळा मक्ता परिसरातील जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव दुरुस्तीचे कामे पुर्ण करुन सदर तलाव बाह्यस्त्रोताद्वारे चालविण्याकरिता ई-निविदाद्वारे चालविण्यासाठी अटी व शर्तीच्या अधिन राहुन भाडेतत्त्वावर देण्यात आला असुन जलतरण तलाव आता सुरु करण्यात आला आहे. 
जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव दुरुस्ती अभावी मागील १४ वर्षापासुन बंद आहे. परंतु आता तलावाची दुरुस्तीचे काम पुर्ण करण्यात आले असुन आता हा तलाव बाह्यस्त्रोताद्वारे ई-निविदा काढून गुडगाव दिल्ली येथील निविदाधारक देवा स्विमींग इंस्ट्रक्टर यांना चालविण्याकरित भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. हा जलतरण तलाव तब्बल १४ वर्षानंतर दुरुस्तीकरुन चालविण्यासाठी सुरु करण्यात आला आहे. हा जिल्हयातील सर्वात मोठा जलतरण तलाव असुन पोहण्याकरिता खेळाडु, नागरिक व क्रीडा प्रेमी आदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सदर जलतरण तलाव सुरु होण्यापुर्वी अंतिम पाहणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केली. यावेळी सरपंच गंगासागर राजाराम पाभळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी, क्रीडा अधिकारी संजय बेत्तीवार, नितीन चव्हाण, आंतरराष्ट्रीय खेळाडु शेख अजीन शेख महोम्मद, शम्म खॉ पठाण, शेख बशीर शेख अजीज, अमितकुमार उर्फ मुन्ना अग्रवाल यांची उपस्थिती होती. यावेळी नविन पोहणार्‍यांना लाईफगार्ड तसेच जलतरण मार्गदर्शक यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हयातील नागरिकांनी या जलतरण तलावाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे

Post a Comment

أحدث أقدم