गार्डन मध्ये फिरायला गेलेल्या महिलेचा विनयभंग; बारा जणांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
सोमवार 29 मे 2023
औंढा नागनाथ शहरातील गार्डन परिसरात व इदगाह मैदान परिसरात महिलेला नेऊन तिचा विनयभंग केला. तसेच शिवीगाळ केली. या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल झाला.
यापैकी तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी फिर्यादी महिलाने तक्रारमध्ये असे म्हटले आहे की, मी गार्डनमध्ये फिरायला आले होते. त्या ठिकाणी विनाकारण मला छेडण्यात आले. यावेळी माझ्यासोबत
असलेल्यालाही शिवीगाळ करून
मारहाण केली. महिलेच्या फिर्यादीवरून वसी इनामदार, शमशुद्दीन इनामदार, सय्यद करीम, सोहेल कुरेशी, अमेर पठाण, नेहाल सय्यद, रोहिस शेख, अफरोज शेख, मुजाहिद पठाण, सलमान पठाण, अब्राल पठाण, अश्फाक खान यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षा रोकडे करत आहेत
إرسال تعليق