अनोळखी व्यक्ती वावरत असल्यास पोलिसांना कळवा

अनोळखी व्यक्ती वावरत असल्यास पोलिसांना कळवा 
पोलीस अधीक्षक जी श्रीधर 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
 सोमवार29 मे2023

हिंगोली गावात अनोळखी व्यक्ती वावरत असताना त्याला चोर समजून हल्ला करणे टाळावे, नसता हल्लोखोरांवर गुन्हा दाखल केला जाईल अशा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी दिला आहे.
 तसेच अनोळखी व्यक्तीबाबत पोलिसांना कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यातील उखलाड येथे २७ मे रोजी चोर समजून तीन संशयित मुलांना मारहाण केल्यामुळे त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला असून इतर दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत, त्यामुळे उखलाड या गावातील हल्ल्यात सहभागी झालेल्या सर्व गावकऱ्यावर कलम ३०२ भादवी प्रमाणे
गुन्हा
दाखल
होऊन हल्ला गावकरी
करणारे
झाले
अटक.
सदर आहेत. सदर
घटनेच्या
अनुषंगाने
गावात कुणीही
संशयित लोक फिरत असल्यास तात्काळ ११२ वर कॉल करून, किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा पोलीस नियंत्रण कक्ष फोन न. ८६६९९००६७६ येथे कॉल करून पोलिसांना माहिती द्यावी. कुणीही चोर समजून संशयित इसमावर हल्ला करणार नाही. सदरचे संशयित लोक हैं अनेक कारणासाठी किंवा कोणत्याही कामासाठी आपल्या गावात आलेले असू शकतात किंवा बाहेर राज्यातील

 अनोळखी व्यक्तीबाबत पोलिसांशी संपर्क साधावा- पोलिस अधिक्षक जी श्रीधर
अनोळखी व्यक्तीस चोर
 समजून हल्ला केल्यास होणार गुन्हा दाखल
- परभणी जिल्ह्यातील घटनेत गावकऱ्यांना खूनाचा गुन्हा
कामगार तसेच वीट भट्टी वरील कामगार वगैरे असू शकतात. खोटी अफवा पसरवू नये व खोट्या अफवांना बळी पडू नये. यापूर्वी अनेक ठिकाणी निष्पाप लोकांना चोर समजून मारल्यामुळे गावकऱ्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या अनुषंगाने गावकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم