हिंगोलीत सात ग्रामसेवक बनले ग्रामविकास अधिकारी पदोन्नतीचे आदेश काढल्यानंतर केला जंगी सत्कार
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
शुक्रवार 19 मे 2023
हिंगोली : पंचायत विभागाने ग्रामसेवकांच्या पदोन्नत्यांचे आदेश काढले आहेत. त्यांना आता ग्रामविकास अधिकारीपदी पदोन्नती मिळाली असून, जि. प. मध्ये सत्कारही करण्यात आला.
औंढा नागनाथ पं. स.तील जी. पी. हलबुर्गे, कळमनुरी पं. स.तील व्ही. ए. मेहेत्रे, हिंगोली पं. स.तील डी. डी. घुगे, कळमनुरी पं. स.तील एस. ए. शिंदे, औंढा पं. स.तील आर. एस. बर्वे यांना त्याच पंचायत समितीत पदोन्नतीवर नियुक्ती देण्यात आली आहे. कळमनुरी पं. स.तील एस. एम. अन्ननपूर्वे यांना वसमत व औंढ्यातील व्ही. पी. बिच्चेवार यांना सेनगाव पंचायत समितीत नियुक्ती देण्यात आली आहे.
शेकडो पदे रिक्त
पदोन्नत्या नसल्याने रिक्त पदांची संख्याही वाढत चालली आहे. अधिकारी मंडळी याकडे गांभिर्याने पाहायला तयार नाही. दुसरीकडे कर्मचारीच अपुरे असल्याचे ओरड मात्र सातत्याने केली जाते. पदोन्नती भरायची शेकडो पदे रिक्त राहात असल्यास ही ओरड कशामुळे केली जाते? हेही कळायला मार्ग नाही. यात पदोन्नतीच्या प्रतीक्षेत अनेक शिक्षकांना सेवानिवृत्तीचा नारळ मिळाला. इतर कर्मचाऱ्यांचीही हीच बाब आहे. प्रत्यक्षात पदोन्नती मात्र हाती पडत नसल्याचे दिसत आहे.
इतर विभागांचे काय?
| इतर विभागांच्या पदोन्नत्यांची मागील अनेक दिवसांपासून फक्त चर्चाच होत आहे. मात्र, पंचायत विभागाने त्यांच्या मागून तयारी करीत पदोन्नत्यांचे आदेशही काढले आहेत.
इतर विभागांच्या पदोन्नत्यांमध्ये नेमकी अडचण काय? हे कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे शिक्षण व आरोग्य विभागाच्या पदोन्नत्यांचे भिजत घोंगडे पडून असल्याने वारंवार यावरून ओरड होते, मात्र, तरीही हा प्रश्न मार्गी लागला नाही.
या सर्वांचा जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंदरे, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे, सरचिटणीस राजेश किलचे आदींची उपस्थिती होती
إرسال تعليق