आयपीएल क्रिकेटवर सट्टेबाजी दोघांवर गुन्हा दाखल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

आयपीएल क्रिकेटवर सट्टा; दोघांवर गुन्हा दाखल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
 सोमवार 21 मे 2023 

 हिंगोली सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे आयपीएल क्रिकेटवर सट्टेबाजी  करून लोकांची फसवणूक करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
 ही कारवाई २० मे रोजी दुपारी करण्यात आली.

याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून सतीश भास्कर भगत (रा. वायचाळ पिंपरी), बाळू ऊर्फ बालाजी मुरकुटे (रा. वाशिम) याचेविरुद्ध गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील सतीश भगत हा त्याचे
मोबाइलवर वेगवेगळ्या लिंक तयार करून इतर व्यक्तींना पाठवून आयपीएल क्रिकेटवर सट्टेबाजी करून फसवणूक करीत असताना आढळून आला.
 तसेच या सट्ट्याची उतारी मोबाईलवर घेताना बाळू मुरकुटे हा घेत आहे. असे 
आढळून आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या वेळी पोलिसांनी रोख १७०० रुपये व एक मोबाईल असा ११ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील • पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस आमलदार संभाजी लेकुळे, गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हळे यांच्या पथकाने केली. आयपीएल क्रिकेटवर सट्टेबाजी लावणाऱ्यांविरुद्धची ही  जिल्ह्यातील चौथी कारवाई आहे 
यापुढे कोणी क्रिकेटवर सट्टेबाजी
 लावून  इतरांची फसवणूक करत असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या
असे सहायक पोलीस निरीक्षक  शिवसाब घेवारे  यांनी महाराष्ट्र 24 न्यूजला बोलताना सांगितले 

Post a Comment

أحدث أقدم