बँकेतील ४० लाखाच्या रोकड चोरी प्रकरणात तीन आरोपींना शिक्षा व दंड

बँकेतील ४० लाखाच्या रोकड चोरी प्रकरणात तीन आरोपींना शिक्षा व दंड

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
23 मे 2023

हिंगोली सेनगाव येथील स्टेट . बँक ऑफ हैद्राबाद शाखेतील कर्मचारी ४० लाखाची रोकड घेऊन आले असता त्यांना गावठी पिस्तुलसह शस्त्राने हल्ला करून ४० लाखाची रोकड जबरीने चोरून नेली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.जी. कांबळे यांनी तीन आरोपींना शिक्षा व दंड सुनावला.

स्टेट बँक ऑफ हैद्राबाद सेनगाव शाखेतील कर्मचारी ३ ऑगस्ट २०१६ रोजी हिंगोली येथून ४० लाख रुपयाची रोकड घेऊन आले असता त्यांना चाकु,
जंब्या व गावठी पिस्तुलचा धाक दाखवून पूर्व तयारीनिशी कर्मचारी व वाहन चालकावर हल्ला करून ४० लाखाची रोकड जबरीने चोरून नेली होती. या प्रकरणी सेनगाव पोलिसात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला होता.
तत्कालीन
याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, पोलिस निरीक्षक सुनिल रसाळ पोलीस जमादार राहुल  गोटरे   यांनी केला होता. या प्रकरणात पोलिस व ग्रामस्थांनी राजेंद्रसिंग महिपालसिंग बावरी, बादशहासिंग उर्फ बाशासिंग अजबसिंग टाक, जनार्धन रामराव वाघमारे या आरोपींना ताब्यात घेतले
सेनगाव येथील स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखेतील प्रकार कर्मचारी चालकावर हल्ला करून पळविली होती रोकड
होते. सदर प्रकरणात गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण हिंगोली अप्पर न्यायाधिश डी.जी. कांबळे यांच्या समोर चालले. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील एस.डी. कुटे यांनी २० साक्षीदार तपासून युक्तीवाद केला. १८ मे रोजी तिन्ही आरोपींना कलम १२० (ब) भादवीमध्ये १० वर्ष शिक्षा व दंड, कलम  ३ (२५) भारतीय हत्यार कायदा गुन्ह्यात

१ वर्षांची शिक्षा व एक हजार रुपये दंड, तसेच कलम ५ (२७) भारतीय हत्यार कायदा गुन्ह्यात तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दंड सुनावला. सर्व शिक्षा एकत्रित भोगाव्यात असा आदेश दिला आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.डी. कुटे यांनी बाजु मांडली तर त्यांना सरकारी वकील एन.एस. मुटकुळे, सविता एस. देशमुख यांनी सहकार्य केले. तर कोर्ट पैरवी म्हणून एस. जी. बलखंडे यांनीही सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم