ग्रामीण भागातील कर्तबगार महिलांचा सन्मान, पुरस्कार देऊन होणार गौरव
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
गुरुवार 25 मे 2023
हिंगोली : जि. प. महिला व बालविकास विभागाच्यावतीने ग्रामपंचायत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांना सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत / गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी ग्रामपंचायतमध्ये अर्ज करण्याची मुदत २७ मे पर्यंत असून, महिलांनी संबंधित ग्रा.पं. कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. निवड झालेल्या महिलांना ३१ मे रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महिलांनी पुरस्कारासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी केले आहे.
إرسال تعليق