जिल्हयात बारावीचा निकाल ८७ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी५९२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण...!



जिल्हयात बारावीचा निकाल ८७ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी
५९२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण...! 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
 गुरुवार 25 मे2023
हिंगोली 
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. हिंगोली जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा निकाल ८७ टक्के लागला असून या वर्षीही निकालामध्ये मुलीनींच बाजी मारली आहे.
आमदार तानाजी मुटकुळे यांनी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला 
हिंगोली जिल्ह्यातून या परिक्षेसाठी १२९६५ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी ५९२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी, मार्च २०२३ दरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा राज्यातील नऊ विभागीय मंडळांच्या मार्फत घेण्यात आली होती. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती आणि कोकण अशा नऊ विभागात राज्यभरातून १२ लाखांवर विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण संकेतस्थळांवर उपलब्ध होतील. तसेच त्यांची प्रिंट घेता येईल.
३४६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५८२४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १५०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान या वर्षाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातून ७३५३ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी ६१०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८३ टक्के आहे. यासोबतच ५६१२ पैकी ५०८४ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या असून त्यांची टक्केवारी ९० टक्के एवढी आहे.

जिल्हाचा विज्ञान शाखेचा निकाल ९३.०६ टक्के, कला शाखेचा निकाल ७८.२७ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९५.७३ टक्के तर किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचा निकाल ८९.८० टक्के लागला आहे.

□मुलींचा निकाल मुलांपेक्षा ४.५९ टक्के जास्त
राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी, मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९३.७३ टक्के तर मुलांचा निकाल ८९.१४ टक्के लागला आहे. म्हणजेच मुलींचा निकाल मुलांपेक्षा ४.५९ टक्के जास्त लागला आहे.

Post a Comment

أحدث أقدم