सभापती पदासाठी रस्सी खेच सुरू राजेश पाटील ठरणार दावेदार

सभापती पदासाठी रस्सी खेच सुरू राजेश पाटील ठरणार दावेदार 


महाराष्ट्र 24 न्यूज 
7 एप्रिल 2023

  हिंगोली जिल्ह्यातील चार बाजार समित्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यांचे निकालही जाहीर झाले. या बाजार समित्यांमध्ये युती, आघाडी करून नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र, आता सभापतीपदाच्या खुर्चीत कोणाला बसवणार ? हा प्रश्न आहे.

निवडणुका झाल्या असल्या तरीही अजून नवीन संचालकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध होणे बाकी आहे. ही नावे प्रसिद्ध झाली की, पदाधिकारी निवडीची नोटीस काढता येते. त्यामुळे

यात अजून दहा ते पंधरा दिवसांचा काळ जाणार आहे. मात्र, या निवडणुकांनंतर बाजार समितीच्या सभापतीपदाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. हिंगोली बाजार समितीत ज्यांची सत्ता येऊ शकते त्यांच्याकडे शिवसेना ठाकरे ३, शिवसेना शिंदे ३, भाजप २, काँग्रेस २ असे १० संचालक आहेत. तर, विरोधी ८ संचालक आहेत. यात ठाकरे गटाचे राजेश पाटील गोरेगावकर यांना सभापतीपद तर, संतोष टेकाळे यांना उपसभापतीपद मिळणार असल्याची  जोर धरत आहे आहे.

Post a Comment

أحدث أقدم