नागेशवाडी येथे जागतिक पातळीवरील धम्मगुरुंच्या उपस्थितीत बौद्ध धम्म परिषद
अशोक सम्राट मुळेच थायलंड बुद्धमय झाला
पूज्य भदन्त्त डॉ.पोरनचाई पालवधम्मो यांची प्रतिक्रिया
औढा नागनाथ
नागेशवाडी येथील संबोधी महाविहार व विपश्यना केंद्र येथे संबोधी मित्र मंडळ, महाराष्ट्र आयोजित सातवी बौद्ध धम्म परिषद दि. ५ मे रोजी सायंकाळी ६ वा. हजारो नागरीकांच्या व जागतिक पातळीवरील धम्मगुरूंच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या धम्म परिषदेची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाली. तसेच त्रिशरण व पंचशील घेण्यात आले. यावेळी प्रमुख धम्मदेशना पू. भदन्त डॉ. पोरनचाई पालवधम्मो (थायलंड), अध्यक्ष, वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट व प्रा.डॉ.भदन्त खेमोधम्मो महाथेरो, मुळावा यांची झाली. यावेळी वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष पूज्य भदन्त्त डॉ.पोरनचाई पालवधम्मो (थायलंड) हे म्हणाले की, बौद्ध धम्माची मातृभूमी भारत आहे आणि सम्राट अशोक यांच्यामुळे थायलंड बौद्धमय झाला. भारतात बौद्ध धम्म पुनर्जीवीत करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. आम्ही थायलंड मधून पुन्हा भारतात बौद्ध धर्म प्रसार कार्य हाती घेतले आहे. भारतीय संविधानात बौद्ध धम्माचे मुलतत्व अंतर्भूत आहेत. सर्व मानवाला एकत्रित ठेवण्याचे काम बौद्ध तत्वज्ञान करते.विपश्यनेचे महत्व सांगून त्याचे प्रात्यक्षिक ही सादर केले.
उदघाटक म्हणून बोलताना राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई माजी अध्यक्ष न्या.सी.एल.थुल, माजी अध्यक्ष हे म्हणाले की, त्रिगुणी वैशाख पौर्णिमेस या धम्म परिषदेचे आयोजन संबोधीने केले आणि जागतिक पातळीवरील धम्मगुरु आणि इतर मान्यवर आले, ही अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. या धम्म परिषदेने नवीन ऊर्जा दिली आहे ती आपण धम्म प्रसारासाठी वापरली पाहिजे.
अध्यक्षीय समारोपात समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे संस्थापक अध्यक्ष, संबोधी मित्र मंडळ, महाराष्ट्र हे म्हणाले की, समाजातील अंधश्रद्धा, वाईट चालिरिती दूर करून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सिद्धार्थ भालेराव, लोकनेते विजय वाकोडे हे उपस्थित होते त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या धम्म परीषदेत धम्मरत्न पुरस्कार (सन्मानचिन्ह, मानपत्र, रोख रु. ५०,०००) देऊन पू.भदन्त डॉ.पोरनचाई पालवधम्मो (थायलंड), डॉ. मिथिला चौधरी(बांगलादेश), सबुज बरुआ ( बांगलादेश), श्रावणदादा गायकवाड (सामाजिक कार्यकर्ता) छत्रपती संभाजीनगर यांना सन्मानित करण्यात आले. गौरवमूर्ती डॉ.मिथिला चौधरी म्हणाल्या की, संबोधीच्या वतीने बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी माझा होणारा हा सन्मान माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण आहे. भारतात बौद्ध धम्म प्रसारासाठी मी सहकुटुंब कार्य करेल असेही त्या म्हणाल्या. गौरवमूर्ती श्रावणदादा गायकवाड म्हणाले की, आम्हाला हिंदू धर्मात नरक यातना सहन कराव्या लागल्या त्यातून बाहेर पडून मुक्तिचा मार्ग म्हणून आम्ही हजारो चर्मकार बांधवानी बौद्ध धम्म स्वीकरला आहे. प्रास्ताविक भगवान जगताप यांनी, सूत्रसंचलन ममता पाटील यांनी तर आभार नवनाथ जाधव यांनी मानले. ही परिषेद यशस्वी करण्यासाठी बबनराव शिंदे, मुरलीधर ढेंबरे, एल.आर.कांबळे, भगवान जगताप, भीमराव पतंगे, बाळासाहेब अंभिरे, प्रा.डॉ.शत्रुघ्न जाधव, प्रा.डॉ.किशोर इंगोले, गौतम मुंढे, डी.आर.तुपसुंदर, पवन कांडलीकर, बंडू नरवाडे, शेषराव जल्हारे, रोहिदास साखरे, गौतम साळवे, एकनाथ खंदारे, दिपक जाधव, ऍड.सुनिल बगाटे, सोनाजी लांडगे, सुमेध मुळे, बाळू कीर्तने, बाबुराव गवळी, दशरथ खंदारे, अमोल खंदारे, राहुल वाघमारे, गीताबाई साखरे, कांचन कांबळे, सौ.सोनकांबळे, सरसाबाई गायकवाड, अविनाश मालसमिंदर, नवनाथ जाधव, भगवान मानकर, रामप्रसाद घुगे, बद्रीनाथ घुले,बालाजी भुसारे, संतोष वाघ, गौतम श्रावणे, अनिरुद्ध धरपडे आदींनी प्रयन्त केले.
إرسال تعليق