हिंगोलीत बुद्ध जयंती निम्मीत मिलिंद उबाळे मित्र मंडळाच्या वतीने शासकिय रुग्णालयात रूग्णांना खिर वाटप..

*बुद्ध जयंती दिना निम्मीत मिलिंद उबाळे मित्र मंडळाच्या वतीने शासकिय रुग्णालयात रूग्णांना खिर वाटप..*

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
शनिवार6मे 2023

 5 मे हिंगोली  रोजी शहरातील शासकिय रुग्णालयात मिलिंद उबाळे मित्र मंडळाच्या वतीने रुग्णांना खिरदान वाटप करण्यात आले.
सर्व प्रथम तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले व सामुहिकरित्या बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ह नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष जगजितराज खुराणा, माजी नगरसेविका सौ.आशाताई उबाळे, अभियंता अशोक अग्रवाल, डॉ.दिपक मोरे, मिलिंद उबाळे, मिलिंदभाऊ मोरे, इंजि.वसंत विर, इंजि.विकास अंभोरे, विशाल इंगोले, प्रा.विजयकुमार कांबळे, राजु यादव, आबेदअली जहागीरदार, ॲड.सुभाष वाघमारे, सुमित चौधरी, मिलिंद प्रधान, दिपक सेठी, सिद्धार्थ गरपाळ, डॉ.मुकपलवार, रवि पाईकराव, ॲड.स्वप्नीত इंगळे, अशोक इंगोले, सुरेश गायकवाड, सोळुंके, कैलास डिडाळे, शिवानंदआप्पा होकर्णे, सौ.लक्ष्मीबाई कांबळे, सौ.शालीनी उन्हाळे, सौ.प्रा.डॉ. सुवर्णा अंभोरे, सौ.प्रज्ञा लहाने, सौ.संदेशा उबाळे, ज्योती उबाळे यांच्या सह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. रिसाला बाजार येथील ज्ञानबोधी विहार येथे गौतम बुध्द यांची मुर्ती स्थापणा करण्या अगोदर गौतम बुध्द यांच्या मुर्तीची शहरातून भव्य मिरवणुक काढली असता मिलिंद उबाळे मित्र मंडळाच्या वतीने भव्य फटाक्याची आतिषबाजी व पुष्प वर्षाव करण्यात आला..

Post a Comment

أحدث أقدم