नगर अभियंता रत्नाकर अडशिरे वाशिमला तर अशोक अग्रवाल वसमतला स्थानांतरीत
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 मे2023
हिंगोली नगर विकास
विभागातर्फे शुक्रवारी करण्यात • आलेल्या अभियंत्यांच्या बदलीत हिंगोली येथील अभियंता रत्नाकर अडशिरे यांची वाशिम नगर पालिकेत तर वाशिम येथील अशोक अग्रवाल यांची वसमत नगर पालिकेत बदली • करण्यात आली आहे.
स्थापत्य अभियंता श्रेणी अ मधील वरिष्ठ अभियंता असलेले अशोक अग्रवाल हे हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. हिंगोली नगर पालिकेत सर्वाधिक काळ कर्तव्य बजावल्यानंतर त्यांनी जालना व वाशिम नगर पालिकेत काम केले आहे. मध्यंतरीच्या काळात हिंगोली
अभियंता अशोक अग्रवाल व अभियंता रत्नाकर अडसरे यांची कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून जिल्ह्यात ओळख आहे
जिल्हा प्रशासनांतर्गत ते प्रशासन अधिकारी म्हणुनही कार्यरत होते. अभियंता रत्नाकर अडशिरे हे सुद्धा जिल्ह्यातीलच रहिवाशी असून वसमत नगर पालिकेत त्यांनी सर्वाधिक काळ कर्तव्य बजावले आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर गतवर्षी त्यांना एका वर्षाची मुदतवाढ मिळाल्याने ते हिंगोली येथे कार्यरत होते. अभियंता अशोक अग्रवाल हे वाशिम येथून वसमत येथे तर रत्नाकर अडशिरे हे हिंगोली येथून वाशिम येथे. लवकरच रुजु होणार आहेत.
إرسال تعليق