बचतीच्या नावाखाली ६.९१ लाखांचा गंडा पोलिसात गुन्हा दाखल

बचतीच्या नावाखाली ६.९१ लाखांचा गंडा
 पोलिसात गुन्हा दाखल

 महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
17 मे 2023

हिंगोली यशस्विनी महिला बचत योजनेत रक्कम व सोने जमा केल्यास चांगले व्याज मिळवून देतो, असे म्हणून एका महिलेची ६ लाख ९१ हजार ४५० रुपयांची फसवणूक करण्यात आली.

सविस्तर माहिती अशी की यमुनाबाई सीताराम सानप (रा. जिजामातानगर, हिंगोली) यांच्या फिर्यादीवरून सुनीता काशिनाथ कुबडे (रा. जिजामातानगर, हिंगोली)
शहर पोलीस 
ठाण्यात १६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला तक्रारीत म्हटले आहे की, १० नोव्हेंबर २०१५ ते २१ फेब्रुवारी २०२० या काळात सुनीता कुबडे यांनी त्यांना यशस्विनी महिला बचत योजना आहे, असे सांगून यमुनाबाई सानप व त्यांची मुलगी अनिता सुभाष मुंढे यांच्याजवळील वेळोवेळी ५ लाख ८३ हजार रुपये तसेच ६० हजारांचे ११ ग्रॅम आहे.
सोन्याचे गंठण, २५ हजारांची अंगठी असा एकूण ८ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल घेतला. त्यानंतर एकूण १ लाख ७६ हजार ५५० रुपये व्याज दिले. मात्र, ६ लाख ९१ हजार ४५० रुपये व दागिने अद्याप परत न करता फसवणूक करण्याच्या उद्देशाने घेऊन गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे
वरील सोने व रक्कम न दिल्यामुळे हिंगोली शहर पोलिसात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला 
पुढील तपास हिंगोली शहर पोलीस करत आहेत

Post a Comment

أحدث أقدم