बंजारा समाज सत्ताधारी बनला पाहिजे प्रकाश आंबेडकर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
11जून2023
हिंगोली : बंजारा समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय मागासलेपण पुसून काढण्यासाठी बंजारा समाजाने सत्ताधारी बनले पाहिजे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
हिंगोली येथील ओमसाई मंगल कार्यालयात १० जून रोजी दुपारी बंजारा परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी सुजात आंबेडकर, राज्य उपाध्यक्ष प्रा. नागोराव पांचाळ, डॉ. सुभाष राठोड,
मोहन राठोड, रवींद्र वाढे, जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे, विनोद नाईक, ज्योतीपाल रणवीर, शेख अतिकूर रेहमान वसंत खंदारे आदींची उपस्थिती होती. यावेळी अॅड. आंबेडकर म्हणाले, जो पक्ष बंजारा समाजाला जास्तीत जास्त उमेदवारी देईल, तो खरा पक्ष. केवळ दारू, मटन आणि पैसा देऊन वापर करणारा पक्ष कधीच आपला होऊ शकत नाही. भटक्या विमुक्त जातीत होणारी घुसखोरी थांबवा, असा आवाहनही शासनाला त्यांनी केले. यावेळी ऊसतोड बांधवांसाठी असलेल्या सुविधेकडे लक्ष वेधले.
إرسال تعليق