जिल्ह्यातील ४३५ मुख्याध्यापकांना वेतन बंद करण्याची नोटीस बजावली
ही शेवटची संधी शिक्षणाधिकारी
संदीप कुमार सोनटक्के
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
मंगळवार6 जून 2023
हिंगोली जिल्ह्यातील 435 मुख्याध्यापकांना वेतन बंद करण्याचा नोटिसा बजावल्या
NOTICE याबाबत शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के म्हणाले. या शाळातील विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन करण्यासाठी ही शेवटची संधी आहे. जर यात काही अडचणी असतील तर त्या दूर कराव्यात अन्यथा कारणांचा आढावा तरी सादर करावा. मात्र, ही प्रक्रिया न केल्यास शाळांचे नुकसान होणार असून, शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यास मुख्याध्यापकांसह संबंधित शिक्षकच जबाबदार राहणार असल्याचेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांचे १०० टक्के आधार व्हॅलिडेशन करण्यासाठी शासनाकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. आता १५ जूनची शेवटची मुदत दिली आहे. यादरम्यान १०० टक्के व्हॅलिडेशन न झाल्यास संबंधित मुख्याध्यापकांना पुढील महिन्याचेही वेतन अदा केले जाणार नाही, असा इशारा प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी दिला आहे.
माध्यमिकच्या शाळांना नोटिसा बजावल्यानंतर प्राथमिककडूनही ही कारवाई केली आहे. जिल्ह्यात एकूण १३३९ शाळा आहेत. मात्र, २० ते २५ शाळांनीच विद्यार्थ्यांचे १०० टक्के आधार अपडेशन केले आहे. ९० टक्क्यांपेक्षा जास्त आधार अपडेशन करणाऱ्या ३०० पेक्षा जास्त नाहीत. जवळपास १०० शाळा, तर २५ टक्क्यांपेक्षा कमी आधार व्हॅलिडेशन असलेल्या आहेत, ही अतिशय चिंतेची बाब आहे.
.तर शिक्षक अतिरिक्त
1 ज्या जि. प. शाळांचे आधार व्हॅलिडेशन शिल्लक आहे, त्यांनी वेळेत आधार व्हॅलिडेशन केले नाही तर शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. जि. प. शाळांची संच मान्यता यंदा वेळेत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ८८
टक्क्यांच्या हिशेबाने १ लाख विद्यार्थ्यांमागे किमान ८ ते ९ हजार विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलिडेशनचे काम शिल्लक असण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ३०० च्या आसपास शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती नाकारता येत नाही.
जिल्ह्यातील ४३५ शाळांना नोटिसा
जिल्ह्यातील ४३५ शाळांना प्राथमिक विभागाकडून नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यात ८०, वसमत तालुक्यात ८५, हिंगोली तालुक्यात ८९. कळमनुरी तालुक्यात ५६. सेनगाव तालुक्यात २४५ शाळांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ९५ टक्क्यांपेक्षा कमी आधार अपलोड असलेल्या शाळांचा यात समावेश आहे.
बायकोच सोबत राहात नाही, आधार अपडेट कसे करू साहेब
पालक आधारसाठी अनेक कारणे सांगत आहेत. काहींची जन्मतारीख • चुकली, तर काहींचे नाव चुकले.
काहींनी तर आता बायकोच मला सोडून गेली. आता मुलाचे आधार अपडेट कसे करू? असा सवाल शिक्षकांनाच केला. काहींचे आधार व शाळेतील नाव, जन्म तारीख सगळेच सारखे असतानाही व्हॅलिडेशन होत नाही. यात यंत्रणा हैराण आहे. यावर उपाय काढण्याची मागणी शिक्षकांतून होत आहे.
إرسال تعليق