बासंबा खून प्रकरणात दोघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी तर दोघे फरार

बासंबा खून प्रकरणात दोघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी 
तर दोघे फरार 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
गुरुवार 8जून  2023 

हिंगोली 
बासंबा अंगावर ऑटो घालत असल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या एका २७ वर्षीय युवकास चाकु, लोखंडी रॉड व काठीने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू ६ जून रोजी रात्रीच्या सुमारास झाला होता. या प्रकरणात चौघावर खूनाचा गुन्हा दाखल होऊन त्यातील दोघांना पोलिसांना अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर केले असता १२ जून पर्यंत पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस • व्हि.डी. श्रीमनवार यांनी दिली.
सविस्तर  माहिती अशी की, बासंबा येथील शेख सादीक शेख रशीद याच्या अंगावर ६ जून रोजी शेषराव बेंगाळ याने त्याच्या जवळील ऑटो घालत असताना त्यास तु असे का करतो असा जाब विचारल्याने आरोपीतांनी संगणमत करून शेख सादेकला चाकु, वेळुची काठी, दगड व लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याने. यामध्ये शेख सादीक शेख रशीद याचा मृत्यू झाला. तसेच या भांडणात शेख सादीकची आई अलिमाबी फिर्यादीवरून 
बासंबा पोलिसात चौघावर गुन्हा दाखल
करण्यात आला 
 दोन आरोपींना पाच दिवसाची पोलिस कोठडी उर्वरित दोन आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना गावात पोलिस बंदोबस्तात वाढ़
सुद्धा आरोपीतांनी मारहाण केली. सदर प्रकरणात ७ जून रोजी बासंबा पोलिसात शेख सोहेल शेख रशीद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेषराव गोविंद बेंगाळ, विठ्ठल गोविंद बेंगाळ, किसन गोविंद बेंगाळ, देवराव गोविंद बेंगाळ सर्व रा. बासंबा या चौघावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यांत आला. या घटनेमुळे जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी गावामध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना दिल्याने पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली.

घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अकारी प्रशांत देशपांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लु, बासंबा ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्ही.डी. श्रीमनवार, सहाय्यक पोलिस आहेत. 

निरीक्षक विलास चवळी यांनी भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेतली. या गुन्ह्यातील आरोपीपैकी विठ्ठल गोविंद बेंगाळ व देवराव गोविंद बेंगाळ या दोन आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली. उर्वरित दोन आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह बासंबा ठाण्याचे गजानन कऱ्हाळे, अशोक काकडे, रामप्रसाद सोळंके, खंडेराव नरोटे यांचे पथक रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक  श्रीमनवार हे करत आहेत 

Post a Comment

أحدث أقدم