हिंगोली आज रिंगण सोहळा मुख्याधिकारी अरविंद मुंढे



हिंगोली नगर परिषदेच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
09 जून 2023 
हिंगोली 
 श्री संता शिरोमणी नामदेव महाराजांचा भव्य पालखी रिंगण सोहळा ९ जुनला हिंगोलीत असल्याने नगर परिषदेच्या वतीने स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे.
श्री क्षेत्र नसी नामदेव येथील आद्यसंत श्री नामदेव महाराजांची पालखी दरवर्षी काढली जाते. त्यानिमित्ताने हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर रिंगण पालखी सोहळा आयोजित केला जातो. त्यानुसार यंदाही नर्सी नामदेव येथुन पालखी निघाली असुन ९ जुन रोजी दुपारी ४ वाजता हिंगोली शहरात आगमन होणार आहे. हिंगोलीतील महाराजा अग्रसेन चौकात पालखीचे स्वागत नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. हि पालखी इंदिरा गांधी चौक, जुन्या नगर परिषद जवळुन रामलीला मैदानावर पोहचणार आहे. याठिकाणी भव्य रिंगण पालखी सोहळा आयोजित करण्यात आला असल्याने या सोहळ्यात हिंगोली शहरातील भविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी केले आहे.
               
  रामलिला मैदानावर अश्वांचे रिंगण

श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त दरवर्षी रामलिला मैदानावर रिंगण सोहळा आयोजित केला जातो. त्यानिमित्ताने ९ जुनला रामलिला मैदानावर पालखी सोहळ्यानिमित्त रिंगण सोहळा आयोजित केला असुन याठिकाणी ११ अश्वांचे रिंगण होणार आहे. तसेच भव्य अतिषबाजीही केली जाणार आहे. पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी नगर पालिकेच्या वतीने केली जात असुन भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी केले आहे.



Post a Comment

أحدث أقدم