भाजप नेते वीरकुँवर अण्णा यांची निवडणुक प्रमुख पदी बिनविरोध निवड

भाजप नेते वीरकुँवर यांची निवडणुक प्रमुख पदी निवड

महाराष्ट्र 24 न्यूज
09जून2023 नेटवर्क

हिंगोली भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते गोवर्धन वीरकुँवर यांची हिंगोली विधानसभा निवडणुक प्रमुख पदी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवड केली आहे.

तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून भारतीय जनता पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते असलेले गोवर्धन वीरकुँवर हे पक्षातील सर्वांत जुने कार्यकर्त्यांपैकी आहेत. भारतीय जनता युवा मोर्चा पासून राजकारणात सक्रीय झालेल्या वीरकुँवर यांनी हिंगोली शहराध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस पदावर कार्य केले आहे. हिंगोली
नगर पालिकेत स्वीकृत सदस्य म्हणुन त्यांची निवड झाली होती. विशेष म्हणजे हिंगोली नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आठ जागा ज्या वेळी निवडुन आल्या होत्या. त्यावेळी वीरकुँवर हेच पक्षाचे समन्वयक होते.

शिक्षण, बँकींग व सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या गोवर्धन अण्णा वीरकुँवर यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हिंगोली विधानसभेच्या प्रमुख पदी निवड करण्यात आल्याने पक्षातील निष्ठावंतांच्या गोटातून समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم