वाहन चोरी करनारी आंतरराज्य टोळी हिंगोली पोलीसाच्या जाळ्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

वाहन  चोरी करनारी आंतरराज्य टोळी हिंगोली पोलीसाच्या जाळ्यात, 
स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
 शुक्रवार9 जून 2023
 हिंगोली ग्रामीन पोलीस स्टेशन अंतर्गत लिंबाळा येथुन 3जून रोजी  आयशर टेंम्पो चोरी गेल्याबाबत पो.स्टे.ला गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा समांतर तपास करुन छडा लावन्यासंदर्भाने मा. पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर यांनी पोनि पंडीत कच्छवे स्थागुशा याना सुचना देवुन सपोनि शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात एक पथक नेमले होते. त्या पोलीस अनुषंधाने पोलीस पथक काम करीत होते.
०१ आयशर
टेम्पो, ०१ अल्टो कार असा एकुण १० लाखाचा मुद्देमाल जप्त. आरोपीवर दरोडा, जयरीचोरी, वहानचोरीचे अनेक राज्यात गुन्हे दाखल आहेत.
स्थागुशा पथकास गोपनिय माहिती मिळाली की सदर लिंबाळा येथिल आयशर ट्रक चोरी करनारा ईसम हा छ. संभाजीनगर जिल्ह्यात आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन स्थागुशा पोलीस पथक सिल्लोड येथे जावुन आरोपी नामे १) खुर्शीद अहमद बशीर अहमद वय ५० वर्ष रा. चंद्रानगुट्टा पलकनुमा पॅलेस हैद्राबाद (आंध्रप्रदेश) यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता आरोपीने लिंबाळा मक्ता येथिल आयशर ट्रक चोरी केल्याची कबुली देवुन त्याचा मित्र नामे २) आरेफ अहमद शेख रा. आळंद ता. फुलंब्री यास विकल्याचे सांगीतले. पोलीस पथकाने लागलीच आरेफ अहमद शेख रा. आळंद यास ताब्यात घेतले असता आरेफ शेख याने सदरचा आयशर टेम्पो त्याचा मित्र नामे ३) रोमान उर्फ शेख शाहेद अख्तर शेख रफीक रा. रेंगटीपुरा छ. संभाजीनगर ४) अझर अकबर शेख रा. गारखेड परीसर शैलेष बार जवळ छ. संभाजीनगर याच्या मार्फतीने इसम नामे ५) शे. शाहेद शे. वाहेद रा. उस्मानाबाद याला विकल्याचे सांगीतले. पोलीस पथकांनी सदर गुन्हयातील आयशर ट्रक जप्त केला असुन सदर आरोपीकडे अधिक विचारपुस करता आरोपी क १ ते ३ यांनी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुंज येथुन सुद्धा ०१ अल्टो कार चोरी केल्याची कबुली देवुन ती काढुन दिली. अशाप्रकारे आरोपीकडुन आतापर्यंत हिंगोली व यवतमाळ जिल्यातील प्रत्येकी १ असे दोन गुन्हे उघड झाले असुन १० लाखाचा मुद्देमाल जप्त करन्यात आला आहे. तसेच आरोपीकडुन आनखी गुन्हे उघड होन्याची शक्यता आहे..
 हिंगोली नगरपालिकेचा उपक्रम
मेरी लाइफ मेरा हिंगोली  स्वच्छ शहर ...

यातील आरोपी नामे खुर्शीद अहमद बशीर अहमद वय ५० वर्ष रा. चंद्रानगुट्टा पलकनुमा पॅलेस हैद्राबाद (आंध्रप्रदेश) हा वाहन चोरीचा आंतरराज्यीय गुन्हेगार असुन तो मागील कांही दिवसापुर्वी जळगाव कारागृहातुन सुटल्याची माहिती आहे. तसेच आरापी खुर्शीद अहमद वर कर्नाटक, तेलंगना, महाराष्ट्र राज्यात २० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असुन महाराष्ट्रातील ०५ जिल्ह्यातील पोलीसाना हवा असल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्य व गोपनिय माहितीच्या आधारे आंतरराज्यीय गुन्हेगारास बेड्या ठोकल्या आहेत. सदरची कार्यवाही मा. श्री जी श्रीधर पोलीस अधीक्षक हिंगोली श्रीमती अर्चना पाटील अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली, पोलीस निरीक्षक श्री पंडीत कच्छवे यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे सपोनि शिवसांब घेवारे,

अमलदार गजानन पोकळे, किशोर कातकडे, लिंबाजी वाव्हळे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, हरीभाऊ 
गुंजकर, प्रमोद थोरात यांनी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم