प्रकाश वाढवे याची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड अधिकाऱ्याकडून कौतुकाची थाप


प्रकाश वाढवे याची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड 
अधिकाऱ्याकडून कौतुकाची थाप 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
09 जून 2023 

            रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी रायगड जिल्हयातील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचा-यांना आनंदाची बातमी दिली असता यामध्ये 
जिल्हा विशेष शाखा खालापूर विभागात  म्हणून काम करणारे प्रकाश वाढवे याच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन प्रकाश वाढवे याची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड करण्यात आली प्रकाश वाढवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव व अधिकार अधिकाऱ्याकडून कौतुकाची थाप दिली आहे 
प्रकाश वाढवे हे हिंगोली जिल्ह्यातील पिंपरखेड येथील एका छोट्या गावातून
मुंबई येथे आई-वडिलांसोबत 
कामानिमित्ताने गेले होते
त्याच ठिकाणी आई-वडिलांचे हालाकाची परिस्थिती
असून सुद्धा आपल्या मुलांना पोलीस खात्यामध्ये अधिकारी करायचे आई वडिलांचे स्वप्न होत 
आता ते पूर्ण झाले असून
पोलीस खात्यामध्ये प्रकाश वाढवे यांनी सतत रात्रंदिवस तीस वर्षे सेवा करत
कोरोना काळात अनेक अडचणी आल्या असताना सुद्धा रुग्णांची सेवा केली
तात्काळ वाहन चालक असो किंवा पदाचारी यांना यांना मदत कशी करायची हे मनात भान ठेवून कर्तव्य केले
त्यांची आज सहाय्यक  पोलीस उपनक्षपदी निवड झाल्याने पिंपरखेड येथील पत्रकार सुधाकर वाढवे यांच्यासह  गावातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे 
        पोलिस खात्यात काम करताना समाजातील प्रत्येक घटकांशी नाळ जोडलेली पोलिस कर्मचारी म्हणून जोखमीचे काम करताना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत असते. हे काम करताना समाजात कोणताही तेड अथवा अन्य काही घडामोडी निर्माण होऊ नये यासाठी शर्तीचे उपाययोजना कराव्या लागत असताना काही पोलिस कर्मचारी वर्गानी पोलिस खात्यात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना त्याच्या कामाची पोचपावती म्हणून बढती देण्याची प्रथा असल्याने रायगड पोलीस दलात कर्तव्यदक्ष व उल्लेखनीय काम केलेल्या कर्मचारी वर्गाला कामात पदोन्नती मिळाली असून यामध्ये जिल्हा विशेष शाखा खालापूर विभागात काम करणारे  प्रकाश वाढवे यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती मिळाली आहे. तर या बढती मिळालेल्या प्रकाश वाढवे यांना खालापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळाजी कुंभार व महिला पोलीस अधिकारी सौ.सरला काळे यांनी बढती मिळालेल्या  प्रकाश वाढवे यांच्या खांदयावर स्टार  लावून अभिनंदन करित त्यांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم