हिंगोलीत आज५१ फुटी रावणाचे दहण
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
24 ऑक्टोंबर 2023
सार्वजनिक दसरा महोत्सवः भव्य आतिषबाजी होणार
हिंगोली : येथील ऐतिहासीक
दसरा महोत्सवात २४ ऑक्टोंबर मंगळवार रोजी विजयादशमीच्या दिवशी रात्री ११.४१ वाजता रावण दहनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
या प्रसंगी आमदार तान्हाजीराव मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, य खाकीबाबा मठ संस्थानचे अध्यक्ष महंत कौशल्यदास महाराज, जिल्हा ने परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, वकील संघाचे अध्यक्ष अमोल जाधव, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर, आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विलास आघाव, गटविकास अधिकारी
गणेश बोथीकर, तहसिलदार नवनाथ वगवाड, सेवानिवृत्त तहसिलदार मधुकर खंडागळे, चंद्रकांत लव्हाळे, गणेश बांगर, नागेश धनमने, पिंटू टाले, गणेश साहू, • पंडीत रामजी पांडे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत
सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त दसरा महोत्सवात आज २४ ऑक्टोंबर रोजी रावण दहन असल्याने जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून अनेक नागरीक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचाही. वॉच ठेवला जाणार आहे.
मोठ्या प्रमाणात
मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. रामलिला कार्यक्रमात राम रावण सेनेत युध्दाचा चित्त थारक प्रसंगी सादर करण्यात येईल, यामध्ये कलावंत लक्ष्मणकडून मेघनाथ व राम कडून कुंभकर्ण व रावनाचा वध करण्यात येईल, त्यानंतर बिभिषण कलावंताकडून धार्मिक विधी करून रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे
إرسال تعليق