आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना शासन आपल्या दारी या योजनेतून तात्काळ मदत मुख्याधिकारी संजय दैने

सेनगाव तालुक्यातील 
मौजे शेगाव खोडके येथील स्व.नारायण विठ्ठल खोडके यांनी दिनांक 13/10/2023 रोजी सततची नापिकी व कर्जाला कंटाळून विहीरीमधे ऊडी घेऊन आत्महत्या केली होती दरम्यान सांत्वनपर श्री संजय दैने  मुख्य कार्यकारी जि.प.हिंगोली यांनी त्यांचे राहते घरी  कुटुंबीयाची भेट घेऊन विचार पुस करून .त्या कुटुंबास विहीर मंजुर केली. त्यांच्या तीन  मुलींचे 12 वी पर्यंत मोफत शिक्षणाची व लहान मुलगा समर्थ  खोडके यांचे डोळ्यांचे आजाराचे  निदान करण्याची  जबाबदारी घेतली .तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ शासन आपल्या दारी योजनेतून    देणेसाठी नियोजन केले.आहे
 या वेळी गणेश वाघ उपमुख्य कार्यकारी अधिकारी, संदिप सोनटक्के शिक्षणाधिकारी ,कृषि विकास अधिकारी उत्तमराव वाघमारे गटविकास अधिकारी माधव कोकाटे,प्रदीप बोंढारे कृषि अधिकारी सुभाष पाचपुते, गटशिक्षण अधिकारी श्री गव्हाणे , बालविकास प्रकल्प अधिकारी विवेक वाकडे श्री संतोष खोडके माजी सभापती पंचायत समिती सेनगाव यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचाऱी  यांचेसह सरपंच, उसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم