अपहरण, लुटमार खुनाचा प्रयत्न केलेल्या प्रकरणातील आरोपीची जामीन मंजुर
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
29 ऑक्टोंबर 2023
घटनेची थोडक्यात हकीगत अशी की,
24/फेब्रुवारी /2022 रोजी फिर्यादीने हिंगोली येथील ओरिजीन क्लासेस, जिजामाता नगर येथून आरोपींनी गैरकायदेशीर मंडळी जमवून कार मध्ये डांबुन अपहरण करून शिवीगाळ करून, जीवे मारण्याच्या धमक्या देवुन दोन्ही हाता-पायावर लोखंडी रॉडने मारहाण करून फिर्यादीस 30,000/- रूपये व 4 ग्रॅम सोन्याची अंगठी काढून घेतली अशा प्रकारच्या आरोपावरून फिर्यादीने दि.27/फेब्रुवारी /2022 रोजी पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गु.र.नं. 93/2022 कलम 307, 326, 329, 323, 147, 149, 148, 164, 142, 504, 506 भा. दं. वी. सह कलम 3( 2 ) (5), 3 (2) (व्ही ए) अनुसुचित जाती अ.जमाती अन्याय प्रतिबंधक
कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. तरी सदरील गुन्हातील अटक आरोपी नामे निखील अशोक देवकर यांने वि.जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे अँड अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. तरी वि. श्रीमती एस. एन. माने मॅडम यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद आयकुन दि.23 ऑक्टोंबर 2023 रोजी आरोपीचा जामीन अर्ज मंजुर केला आहे.
आरोपीच्या वतीने ॲड सतीष देशमुख, ॲड सुनिता देशमुख, ॲड शामकांत देशमुख ॲड प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांनी युक्तीवाद केला. त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड आदित्य देशमुख, ॲड राहुल देशमुख, अँड.बिराज देशमुख, ॲड रजत देशमुख, ॲड योगेश खिल्लारे, अँड. अविनाश राठोड ॲड प्रकाश मगरे, ॲड आनंद खिल्लारी, ॲड . मुदस्सिर अब्दुल रहिम, ॲड . सुमित सातव, ॲड श्रध्दा जैस्वाल, ॲड . लखन पठाडे, ॲड आकाश चव्हाण, अँड. शुभम मुदीराज, ॲड सुजीत गायकवाड, ॲड गजानन घुगे, ॲड तुषार पवार, ॲड सुमित कदम यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق