मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीवरून परतले
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
26 सप्टेंबर 2023
मंगळवारी दसरा
मेळाव्याला संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षण, मंत्रिमंडळ चर्चेची शक्यता आहे. अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजी व्यक्त केली होती, त्यातच आता शिंदे-फडणवीस दिल्लीला गेल्यामुळे या दौऱ्यात नेमक्या काय घडामोडी घडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
१५ दिवसांमधला या दोन्ही नेत्यांचा हा दुसरा दिल्ली दौरा होता
रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यात सुरू असलेले मराठा आरक्षणाचे वादळ या मुद्यांवर दौऱ्यात चर्चा होऊ शकते. अजित पवारांनीही मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनाआधी व्हावा, यासाठी आग्रह धरला होता. डिसेंबर महिन्यामध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. मागच्या दिल्लीत गेले होते, त्यानंतर अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्री पद देण्यात आले होते, तसेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्रिपदाचे वाटपही करण्यात आले होते. या दौऱ्यानंतर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागणार का ? याकडे लक्ष लागले आहे
إرسال تعليق