हिंगोलीत भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन

हिंगोलीत भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म  ग्रंथ वाचन

2नोव्हेंबर 2023
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
  शहरातील रिसाला बाजार येथे माजी नगरसेवीका सौ.आशाताई उबाळे यांच्या निवासस्थानी  2नोव्हेंबर भगवान  बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथ याचे वाचन कु.स्पर्शिका मिलिंद उबाळे हिने केल्यामुळे बौद्ध समाजाच्या महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, तसेच धमा देसा विपश्यना केंद्र चिंचोली येथे पूज्य सत्यनारायान गोयंका गुरुजी यांचे जन्म शताब्दी निमित्त दिनांक.22-10-2023 ते 02-11-2023 खास महिलांच्या आग्रहास्तव या कालावधीत फक्त महिला साठी दहा दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते, या विपश्यना शिबीरात हिंगोली नगरपालिकेतील रिसाला बाजार प्रभाग क्रमांक 2 मधील माजी नगरसेवीका सौ.आशाताई उबाळे यांनी लाभ घेतला असता त्यांचा हि सत्कार करण्यात आला.
सर्व प्रथम महिला मंडळाच्या वतीने सामुहिक बुध्द वंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळी रिसाला बाजार येथील लक्ष्मीबाई कांबळे, कांताबाई उबाळे, सौ.आशाताई उबाळे, पार्वतीबाई श्रीखंडे, शांताबाई मोरे, मुक्ताबाई सुर्यवंशी, सुभद्राबाई जावळे, अन्नपुर्णाबाई इंगोले, सयाबाई भिसे, लताबाई इंगोले, भागीरथी भालेकर, ञिशला गायकवाड, सुनिता शेळके, अर्चणा ओंकार, लताबाई लाटे, बेबीबाई सुर्यवंशी, ज्योती उबाळे, ज्योत्सना अंभोरे, ञिशला उबाळे, वर्षा उबाळे, स्नेहा ढोणे, प्रज्ञा लहाने, संदेशा उबाळे, सिमा सरकटे, अश्विनी उबाळे, प्रियंका खिल्लारे, कविता थोरात, स्पर्शिका उबाळे, सान्वी उबाळे, मुकेश उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم