जिल्हयात एकाच वेळेस विशेष कोम्बिंग (ऑलआऊट) ऑपरेशनची मोठी कारवाई
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
08 नोव्हेंबर 2023
हिंगोली
जिल्ह्यात जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हयात एकाच वेळी विशेष कोम्बींग (ऑलआउट) ऑपरेशनची कारवाई करण्यात आली. सदर मोहीमेत जिल्हयातील एकुण १९ ठिकाणी जेथे रेकॉर्ड वरील व सराईत गुन्हेगार आहेत अशा ठिकाणी पोलीस पथकाकडुन गुन्हेगार तपासणी करण्यात आली.
जिल्हयातील सराईत गुन्हेगार व लपुन छपुन चालणारे अवैध धंदे बाबत कडक भूमिका घेत तसेच यापुर्वी गंभीर गुन्हयातील तसेच चोरी, जबरी चोरी, घरफोडी व दरोडा या गुन्हयातील आरोपींना नियमित तपासणे व त्यांचे विरुध्द कडक प्रतिबंधक कार्यवाही सुरू केली असुन त्याचाच भाग म्हणुन गुन्हेगारांची तपासणी, अवैध धंदे विरूध्द कार्यवाही, फरार व न्यायालयाचे वारंट मधील आरोपी शोध अशा व्यापक हेतुने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली मंगळवार पासून दि. ७ ते बुधवार ८ सकाळी पाच वाजेपर्यंत संपुर्ण जिल्हयात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले होते.
सदर मोहीमेत अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपान शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत देशपांडे, सुरेश दळवे, पोलीस निरीक्षक स्थागुशाचे पंडीत कच्छवे, पोलीस निरीक्षक विकास पाटील, वैजनाथ मुंडे, रणजित भोईटे, गणेश राहीरे, शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, गजानन बोराटे, विलास चवळी, गजानन मोरे, रवि हुंडेकर, अरूण नागरे, सर्वच पोलीस स्टेशन मधील दुयम पोलीस अधिकारी व मोठया प्रमाणात पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते. सदर मोहीमेत जिल्हयातील एकुण १९ ठिकाणी जेथे रेकॉर्ड वरील व सराईत गुन्हेगार आहेत अशा ठिकाणी पोलीस पथकाकडुन गुन्हेगार तपासणी करण्यात आली. तसेच जिल्हयातील मोक्का मधील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार व पाहीजे असलेले आरोपींचीही तपासणी करण्यात आली.
जिल्हयात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत महत्वाचे ठिकाणी नाकाबंदी करण्यात येवुन वाहनांची कसून तपासणी करण्यात आली तर नाकाबंदी दरम्याण पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे एक संशयीत वाहन डिटेन करण्यात आले. तसेच सदर मोहीमेत पोलीस स्टेशन वसमत शहर, हिंगोली शहर व कुरूंदा येथे अवैध्द शस्त्र बाळगणा-या विरूद्ध हत्यार कायद्याअन्वये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे
إرسال تعليق