देशात दर तासाला तब्बल ५५ अपघात, १९ जणांचा मृत्यू

देशात दर तासाला तब्बल ५५ अपघात, १९ जणांचा मृत्यू
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालातून आकडेवारी जाहीर

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
10 नोव्हेंबर 2023
 देशात दर तासाला तब्बल ५५
अपघातांची नोंद होते तर दर तासाला १९ जण या अपघातात जीव गमावतात. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानेच ही अपघातविषयक आकडेवारी जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या आकडेवारीत २०२२ मध्ये अपघातांच्या संख्येत तब्बल १२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे मान्य केले आहे.
२०२२ची रस्त्यांवरील अपघातांची आकडेवारी आता जाहीर करण्यात आली आहे
  त्यात २०२२ मध्ये देशातील विविध अपघातांत ४ लाख ६१ हजार ३१२ अपघात झाले असल्याचे नोंदविले आहे. त्यात ६८ हजार ४९१ जणांचा मृत्यू झाला. यावरून देशात दर तासाला तब्बल ५५ अपघात होतात तर त्यात १९ जणांचा मृत्यू होतो, दर तासाला देशात होणाऱ्या अपघातातील एक तृतीयांश अपघात जीवन संपविणारा असतो, असे यातून स्पष्ट होते. या अपघातात मृत्यूमुखी पडणारे युवकच जास्त असल्याचेही स्पष्ट केले आहे. झालेल्या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींमध्ये ६६.५ टक्के मृत, हे १८ ते ४५ वर्षे वयोगटातील
'आहेत, असे नोंदविले आहे.
या अहवालातील नोंदीनुसार २०२१ च्या तुलनेत अपघातांची संख्या ११.९ टक्क्यांनी वाढली असल्याचेही मान्य करण्यात आले. सोबतच अपघातातील जखमींचे प्रमाणही १५.३ टक्क्यांनी वाढले असल्याची कबुली दिली आहे.
त्यातून हे रस्ते की मृत्यूचे सापळे, हा प्रश्न तर निर्माण होतोच शिवाय वाढत्या वाहनांच्या संख्येसोबत बेजबाबदारपणे वाहन चालवून मृत्यूला निमंत्रण देणाऱ्यांचीही संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. देशातील सर्व राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातही अपघातांचे प्रमाण वाढल्याचे मान्य करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم