हिंगोली जिल्ह्यातील मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण सुरू

हिंगोली जिल्ह्यातील मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण सुरू

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
23 जानेवारी 2024
हिंगोली राज्य शासनाच्या निर्देशानुसार
मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील १८२ पर्यवेक्षकांना जिल्हास्तरीय प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार उपस्थित होते. मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाच्या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात १८२ पर्यवेक्षक व ३ हजार ५७५ प्रगणकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यासाठी ५५ पर्यवेक्षक व ८७७ प्रगणक, सेनगाव तालुक्यासाठी २० पर्यवेक्षक व ४४४ प्रगणक, कळमनुरी तालुक्यासाठी ३९ पर्यवेक्षक व ५७० प्रगणक, वसमत तालुक्यासाठी
 मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण केले जाणार
सर्वेक्षणासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रगणकांना जिल्हास्तरीय प्रशिक्षण
५२ पर्यवेक्षक व ८०८ प्रगणक आणि औंढा नागनाथ तालुक्यातील २६ पर्यवेक्षक व ८९६ प्रगणकाचा समावेश आहे. हे सर्व पर्यवेक्षक व प्रगणक घरोघरी जाऊन आवश्यक ती माहिती गोळा करणार आहेत. या सर्व पर्यवेक्षकांना व प्रगणकांना तालुकास्तरावर २१ व २२ जानेवारी रोजी दोन दिवशीय तालुकास्तरीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. २३ जानेवारी पासून प्रत्यक्षात मराठा सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पर्यवेक्षकांना व प्रगणकांना आवश्यक ती माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم