गावठी पिस्टल सह एका इसमास पकडले वसमत ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोलीची मोठी कार्यवाही


गावठी पिस्ट सह एका इसमास पकडले वसमत ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोलीची मोठीं कार्यवाही

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
25 जानेवारी2024
मा. पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात मालाविरुध्दचे गुन्हयांना आळा घालण्याचे तसेच अवैध शस्त्र विरोधात कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने, पो.नि. श्री विकास पाटील, स्था.गु.शा. हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. श्री शिवसांब घेवारे यांचे पथक काम करीत होते.
 दिनांक २३/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक वसमत शहर व ग्रामीण हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, इसम नामे दिपक दुधाटे, रा. सारोळा, ता. वसमत याचे जवळ बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल असून तो सध्या त्याचे राहते घरी आहे अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तात्काळ सदर ठिकाणी पोहचुन इसम नामे दिपक राजेश दुधाटे, वय २१ वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. सारोळा, ता. वसमत, जि. हिंगोली यास ताब्यात घेवुन, विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने अवैधरीत्या गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) बाळगीत असल्याचे कबुल करून, एक लोखंडी गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) बॅरल व ट्रिगरयुक्त किंमती २५,०००/- रूपयाचे काढुन दिले. नमुद इसमास गावठी पिस्टल (अग्नीशरत्र) सह ताब्यात घेवुन पो.स्टे. वसमत ग्रामीण येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यानंतर सुध्दा अवैध हत्यार बाळगणा-यांविरूध्द तिव्र मोहिम करून, कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पो.नि.श्री विकास पाटील, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि.श्री. शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांनी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم