आज ३७ परीक्षा केंद्रावर १४४५९ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

आज ३७ परीक्षा केंद्रावर १४४५९ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
21 फेब्रुवारी 2024
हिंगोली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) २१ फेब्रुवारी ते १९ मार्च व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) १ ते २६ मार्च या कालावधील पार पडणार आहेत. सदरील परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. इयत्ता १२ वी परीक्षेसाठी जिल्ह्यात ३७ परीक्षा केंद्र असून एकुण १४४५९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तसेच इयत्ता १० वी परीक्षेसाठी जिल्ह्यात ५४ परीक्षा केंद्र असुन एकूण १६२४५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
सदरील परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी विभागीय मंडळ औरंगाबाद मार्फत, जिल्हयातं प्राचार्य (जि.शि.व प्र. संस्था), शिक्षणाधिकारी (मा.), शिक्षणाधिकारी (प्रा.), शिक्षणाधिकारी (योजना.), उपशिक्षणाधिकारी (मा.) या ५ भरारी पथकाची नियुक्ती केलेली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशान्वये परीक्षेचे संचलन सुयोग्य व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत यासाठी परीक्षा चालू असतांना परीक्षा केंद्राना भेटी देण्यासाठी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहेत. परीक्षा काळात गैरप्रकार

३७ परीक्षा केंद्र

करण्या-या विद्यार्थ्यांवर कडक कार्यवाही करण्याचे आदेशीत केलेले आहे. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी बैठे पथक नियुक्ती करण्यात आले आहे. बैठेपथक सदस्यांनी एकतास आगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र तपासावयाचे आहे. प्रश्नपत्रिका आणण्यासाठी व उत्तरपत्रिका परिरक्षक कार्यालयात पोहचविण्यासाठी सहाय्यक परिरक्षकासोबत सुरक्षिततेसाठी पोलिस कर्मचारी असणार आहेत. तसेच परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परीसरात मोबाईल बंदी करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परीसरात पोलिस अधिनियम ३७ (१) (३) व १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. परीक्षा कालावधीत पर्यवेक्षणासाठी तालुका अंतर्गत पर्यवेक्षकांच्या शाळेत बदल करण्यात आला आहे. कर्मचारी यांनी परीक्षा कालावधीमध्ये परीक्षेच्या कामात हयगय किंवा हलगर्जी केल्यास कर्मचाऱ्यांविरुध्द कडक कार्यवाही करण्याचेही आदेशीत केलेले आहे. परीक्षा केंद्रावर कॉपी आढळून आल्यास केंद्रसंचालक, पर्यवेक्षक हे जबाबदार राहतील या सर्वांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم