कनेरगाव नाका येथे मराठा आरक्षणासाठी शांततेत रास्ता रोको आंदोलन

कनेरगाव नाका येथे मराठा आरक्षणासाठी शांततेत रास्ता रोको आंदोलन 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
21 फेब्रुवारी 2024
  हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे आज दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोज मंगळवारी  सकाळी ११ वाजता फाळेगाव व आडगाव सर्कल मधील सर्व सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता  रोको आंदोलन करण्यात आले .
                मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हा भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. या रास्ता रोको आंदोलनात फाळेगाव व आडगाव  सर्कल मधील सर्व सकल मराठा समाज बांधव रेल्वे स्टेशन समोर राज्य रस्ता क्र १६१ वर रास्ता रोकोच्या ठिकाणी दाखल झाला होता. या रास्ता रोको आंदोलनात सकल मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी होते .जवळपास दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या वेळी वाहतुक ठप्प झाली होती. 
                     प्रशासनाच्या वतीने मंडळाधिकारी  यांना निवेदन देण्यात आले .एक मराठा लाख मराठा जयघोषाने रास्ता रोको ठिकाण दणाणून गेले .हा रस्ता रोको शांततामय वातावरणामध्ये करण्यात आला .या रस्ता रोकोस पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांचे सह पोलीस कर्मचारी यांनी कडक  बंदोबस्त ठेवला होता. या रास्ता रोको दरम्यान वाशिम कडून हिंगोली कडे जाणारी ॲम्बुलन्स सकल मराठा समाज बांधवांनी जाऊ दिली .
        सकल मराठा बांधवा तर्फे निवेदन देण्यात आले त्यावेळी नायब तहसीलदार एम . एस .खंदारे ,मंडळ अधिकारी एन . डी . नाईक, डीवायएसपी सुरेश दळवी, पोलीस उपनिरीक्षक संतोष आघाव ,पोलीस निरीक्षक रवि हुंडेकर तसेच तलाठी मॅडम एम . के . गोटे हजर होते .कनेरगाव नाका व परिसरातील सर्व सकल मराठा बांधव उपस्थित होते .

Post a Comment

أحدث أقدم