पैनगंगा नदीवर पोहण्यास गेलेल्या तरुण युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू .
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
28जून2024
हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथील पैनगंगा नदीवरील रेल्वे पुलाजवळ दुपारच्या वेळेस मित्रासोबत पैनगंगा नदीवर पोहण्यास गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला .
कनेरगाव नाका येथील दत्ता प्रभू हंबर्डे यांचा नातू जीवन कैलास राठोड वय वर्ष १६ हा आजोबाकडे राहत होता दिनांक २८ जून शुक्रवार रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान रेल्वे पुलाजवळ पैनगंगा नदीवर पोहण्यास गेला . त्याचा मित्र मासे धरत असताना तो पाण्यात उतरला त्याला पाण्याचा अंदाज न लागल्याने तो पाण्यात बुडून मृत्यू पावला .या घटनेची माहिती गावात कळतात गावातील ग्रामस्थ पैनगंगा नदीकडे बुडालेल्या मुलाला पाहण्यासाठी धाव घेऊ लागले . अनेकांनी पाण्यात पोहून बुडालेल्या मुलाचा शोध घेतला परंतु तो मिळाला नाही तो खोल पाण्यात बुडाला असल्याचे सांगण्यात आले . मुलाचे आई-वडील संभाजीनगर येथे राहतात त्यांना कळविण्यात आले .
कनेरगाव नाका येथील भोई समाजाचे चार-पाच युवक संदीप मोहळे,दिनेश मोरे,पवान नेमाडे, ज्ञाना सोळंके यांनी मिळून नदीच्या पात्रात उतरून बुडालेल्या मुलाचा शोध घेऊन त्याला बाहेर काढण्यात आले . घटनेच्या ठिकाणी गोरेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र हुंडेकर सोबत कनेरगाव नाका चौकीचे जमादार पंजाबराव लेकुळे व राठोड व राजनेकर हे हजर होते . या घटनेमुळे कनेरगावात दुःखाचे सावट पसरले आहे.
إرسال تعليق