नीलाबाई इंगळे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
28जून2023
स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमानाने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2024 या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 1 जुलै 2024 रोजी अहमदनगर येथील माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे सकाळी 11 वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सपन्न होणार आहे.
यामध्ये मा. श्री. पंजाबराव डक हवामान अभ्यासक परभणी, मा. श्री. बाबासाहेब पावसे सरपंच संघ चळवळीचे नेते, मा. श्री. डॉ. एस एस मगर. मा. कुलगुरू डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, मा. श्री. एकनाथ ढाकणे. मा. राज्यध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन इत्यादी उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्कार सोहळ्यात राज्यातील सरपंच यांनी केलेले विविध विकास कामांची दखल घेऊन माळधामणी गावच्या प्रथम नागरिक सरपंच नीलाबाई मारोतराव इंगळे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2024 या अतिशय मानाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत आहे.
आजपर्यंत सरपंच इंगळे यांनी गावामध्ये विविध विकास कामे केले असून त्यामध्ये प्रामुख्याने स्वछता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, वृक्ष संवर्धन याचा समावेश आहे.
गावामध्ये केलेल्या विकास कामाच्या जोरावर ग्रामपंचायत माळधामणी यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून पुरस्कार मिळाला तसेच हिंगोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
या गावच्या विकास कामामध्ये ग्रामपंचायत माळधामणी येथील सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, कर्मचारी याचबरोबर गावातील नागरिकांची साथ मिळाली.
राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे गावातील नागरिक यांच्यासह हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
إرسال تعليق