राशन कार्ड साठी लाडक्या बहिणीसह दाजी हैरान पुरवठा विभागाकडून पिळवणूक थांबवा भगवान पठाडे

राशन कार्ड साठी लाडक्या बहिणीसह  दाजी हैरान 
पुरवठा विभागाकडून पिळवणूक थांबवा  
भगवान पठाडे 

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
12जुलै2024
शिधापत्रिका/राशन कार्ड मध्ये नावे समाविष्ट करणे किंवा वगळणे करीता नागरीकांची चालु असलेली धावपळ व होणारी आर्थिक लुट थांबविणे बाबत.

राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत राशन करण्याची अट लागू केल्याने लाभार्थ्यांना राशन कार्ड ची आवश्यकता आहे 
  जिल्ह्यातील अनेक नागरीकांचे राशन कार्ड मध्ये नावे नाहीत तसेच नवीन विवाहित महिलांचे नाव वाढविलेले नाहीत तसेच लग्न होऊन सासरी गेलेल्या महिलांची व मृत्यु होऊन कमी झालेले नागरीकांचे नाव शिधापत्रिकेवर कमी झालेले नाहीत. आत्ताच महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेली नवीन योजना (मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण) या योजनेसाठी राशन कार्डमध्ये नाव असल्याचे आवश्यकता असल्याने राशन कार्डमध्ये महिल्यांचे नाव टाकण्यासाठी जिल्ह्यातील नागरीकांची अतिशय धावपळ चालु आहे. यामध्ये जिल्ह्यातील अनेक दलाल, ऑनलाईन सेंटर, सरकारी सी.एस.सी केंदवाले तसेच आधार अपडेट करणारे व तहसिल मधील कर्मचारी यांच्याकडुन मोठ्या प्रमाणात नागरीकांची आर्थिक लुट चालु आहे.
सदरील लुट थांबविण्यासाठी व नागरीकांना सुविधा मिळवुन देण्यासाठी शासकीय स्तरावरुन महसुल विभागातील तलाठी कर्मचारी यांनी शासकीय स्तरावरुन सर्व तालुक्यातील नागरीकांना राशन कार्ड अद्यावत करुन देण्यासाठी आपल्या स्तरावरुन तात्काळ आदेश निर्गमित करुन व तात्काळ अमलबजावणी होऊन नागरीकांची होणारी आर्थिक लुट व धावपळ थांबविणयासाठी योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भगवान पठाडे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे 

Post a Comment

أحدث أقدم