अनेक पक्षाचे दिग्गज नेते आ. प्रज्ञा सातव यांच्या भेटीला

अनेक पक्षाचे दिग्गज नेते  आ. प्रज्ञा सातव यांच्या भेटीला

महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
02 ऑगस्ट 2824
हिंगोली : विधान परिषद सदस्यत्वाची
शपथ घेतल्यानंतर आमदार प्रज्ञाताई सातव यांचे बुधवारी कळमनुरी येथे आगमन झाले. यावेळी विविध पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रज्ञाताई सातव ह्या दुसऱ्यांदा विजयी झाल्या. आ. प्रज्ञाताई सातव यांच्या विजयाने जिल्ह्यात काँग्रेस आणि महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे. त्यांच्या आमदारकीचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. आमदार प्रज्ञाताई सातव यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर बुधवारी त्यांचे कळमनुरी येथे आगमन झाले. त्यानंतर
जिल्ह्यातील विविध पक्षांतील नेते, पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर, माजी सभापती रूपाली पाटील गोरेगावकर आदींनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

तसेच यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुधीर सराफ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मिलिंद यंबल, प्रकाश थोरात आदींनी आमदार सातव यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले आहे. आमदार सातव यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदाचीही जबाबदारी आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यासह राज्यातील काँग्रेसच्या संघटन वाढीसाठी त्यांना दौरे करावे लागणार आहेत.

Post a Comment

أحدث أقدم