हिंगोलीत जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
19 ऑगस्ट 2024
हिंगोली जिल्हा प्रेस फोटोग्राफर व हिंगोली जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील पाठक यांच्या हस्ते कॅमेऱ्याची पूजा करण्यात आली. यावेळी जेष्ठ फोटोग्राफर संतोष अर्धापुरकर यांनी कॅमेऱ्यात होणाऱ्या आधुनिक बदला संदर्भात माहिती दिली,
संघटनेचे कोषाध्यक्ष विजय गुंडेकर
नवीन नवीन आधुनीक टेक्नॉलॉजीचा वापर फोटोग्राफर यांनी केला पाहिजे. कॅमेरात होणाऱ्या बदला संदर्भात संपूर्ण माहिती घेणून काम करावे. जेणेकरून फोटो पाहून ग्राहकाचे मन प्रसन्न झाले पाहिजे. ग्राहक प्रसन्न झाला तर त्यातच आपले खरे कौशल्य दिसत होते. अशी माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन थोरात, संतोष अर्धापुरकर,सुधाकर वाढवे,
संदीप बोरकर, विजय गुंडेकर,निलेश गरवारे, राजू गवळी,सुनिल प्रधान, बालाजी वाबळे, सचिन जैन,सचिन बंडाळे, बालाजी पारोळकर,प्रज्वल कान्हेड, पिंटू तरोडे, आर्या पवार, पंढरी गायकवाड,शेख आवेज, आदी उपस्थीत होते.
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त गोवा येथील 5दिवसीय कार्यशाळा आयोजीत करण्यात आली. 25 ऑगस्ट 30 ऑगस्ट पर्यंत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळेला हिंगोली जिल्हा प्रेस फोटोग्राफर असोसिएशन व जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन चे सर्व पदाधिकारी जाणार आहेत.
إرسال تعليق