आता संकट बालकावरी १०९८ तात्काळ मदत करी

आता  संकट बालकावरी १०९८  तात्काळ मदत  करी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
23 ऑगस्ट 2024
हिंगोलीः आपल्या आजूबाजूला आपल्याला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचार ग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता संकटग्रस्त असलेली बालके आढळल्यास अंशा बालकांना त्वरित आवश्यक मदत कोठून व कशी मिळवून देता येईल, यासाठी कोठे संपर्क करावा याबाबत सामान्य

नागरिकांमध्ये संभ्रम असतो.
अशा संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीसाठी भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाचे महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत ० ते १८ वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व

संरक्षणाची गरज असलेल्या सर्वज बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा १०९८ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे.

या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना २४७ हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही सदर

CHILD LINE 1098
सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. त्यामुळे १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे

Post a Comment

أحدث أقدم