युवा हृदय सम्राट पैलवान माधवभाऊ सपाटे खरबीकर यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर

युवा हृदय सम्राट पैलवान माधवभाऊ सपाटे खरबीकर यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
12 सप्टेंबर 2024
       हिंगोली जिल्ह्यातील खरबी येथील रहिवासी पैलवान माधव सपाटे यांना यशवंत संघर्ष सेनेच्या वतीने यंदाचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर झालेला आहे, पैलवान माझा सपाटे खरबीकर हे एका गरीब कुटुंबातील असून त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये विशेष अशी कामगिरी केलेली आहे त्यामध्ये आतापर्यंत 25 पेक्षा रक्तदानाचे कॅम्पस घेऊन स्वतः 32 वेळा रक्तदान करून गोरगरिब आणि गरजूवंतांची सेवा केलेली आहे* 
     *त्याचप्रमाणे पैलवान माधव सपाटे यांनी धार्मिक कार्यामध्ये सुद्धा विशेष कामगिरी केलेली आहे गेल्या पाच वर्षापासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये भव्य दिव्य कावड यात्रेचे आयोजन सुद्धा युवा हृदय सम्राट पैलवान माधव भाऊ सपाटे करत असतात या कावड यात्रेचा उद्देश केवळ युवकांच संघटन असून युवक हा निर्व्यसनी, सुसंस्कृत,आणि धार्मिक असावा हेच आहे,एका गरीब कुटुंबातून येऊन सुद्धा त्यांनी आज जिल्ह्यामध्ये पंधरा ते वीस हजार युवकांच संघटन केलेल आहे ही बाब विशेष आहे.*
  *या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्याच अनुषंगणे यशवंत संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विष्णू भाऊ कुराडे यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिम्मित यंदाचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार युवा हृदय सम्राट पैलवान माधव सपाटे यांना जाहीर केलेला आहे.सदरील पुरस्कार ह.भ.प. भगवान महाराज कोकरे (अध्यक्ष -महाराष्ट्र वारकरी महामंडळ, कोकण प्रांत)यांच्या हस्ते दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी शिवाजीराव देशमुख सभागृह, हिंगोली येथे दिल्या जाणार आहे.
   या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم