हिंगोलीत दिव्यांग पक्षकाराला भेटण्यासाठी नायाधीशानी चक्क वाहण गाठले

दिव्यांग पक्षकाराला  भेटण्यासाठी नायाधीशानी चक्क वाहण गाठले 

 महालोक अदालतीत  मोटार अपघाताचे ३० प्रकरणे निकाली 

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
28 सप्टेंबर 2024
हिंगोली -  येथील जिल्हा सत्र न्यायालयात शनीवारी ( ता.२८) महालोक अदालत घेण्यात आली. यामध्ये मोटार अपघाताचे  ३० प्रकरणे निकाली काढली. तर न्यायाधिश यांनी दालन सोडुन पक्षकाराला भेटण्यासाठी चक्क वाहन गाठून न्याय दिला.
दरम्यान येथील जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी (ता.२८) महालोकअदालत घेण्यात आली.मोटार अपघात यासह भूसंपादन, फौजदारी प्रकरणे, दिवाणी, वैवाहिक, कौटुंबिक वाद, नगर पालिका, विज वितरण कंपनी, बँक, असे २३८ प्रकरणे तडजोडी अंती निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली होती.

दरम्यान, या लोक अदालतीत ऍड. सुरेश गडदे यांचे दीव्यांग असलेल्या  पक्षकार पूजा पोतदार या नुकसाभरपाई मिळण्यासाठी यापूर्वी न्यायालयात दावा दाखल केला होता. ४ नोव्हेंबर २०१९ मध्ये पूजा हीचा अपघात झाला होता. या अपघातात पूजा यांचा उजवा पाय निकामी झाला. त्यामुळे ती लोक अदालतीत हजेरी लावली होती. मात्र तीला नायाधीस यांच्या दालनापर्यंत जाता येत नसल्याने स्वतः जिल्हा न्यायाधिश यांनी न्यायासाना वरुन खाली उतरून थेट दीव्यांग पूजा हिच्या गाडी पर्यंत आले. अन् त्यांना न्याय दिला.
या लोक अदालतीत ऍड. सुरेश गडदे यांची मोटार अपघाताची एकूण  २२ प्रकरणे दाखल केली होती. २२ प्रकरणे निकाली काढली आहेत. तर  एकूण मोटार अपघाताची तीस प्रकरणे दाखल करण्यात आली होती. तर पूजा पोतदार हीचा २० लाखांचा दावा न्याशनल इन्शुरन्स  कंपनीचे ऍड. अजय व्यास यांनी मंजूर केला आहे. यावेळी न्यायाधिश लोखंडे, देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली   ऍड. सुरेश गडदे यांच्या मोटार अपघाताच्या वीस लाखांच्या दाव्यास मंजूरी मिळाली आहे.
या लोक अदालतीत ऍड. विपीन अर्धापूरकर, ऍड. मनीषा गडदे , ऍड. कानबाराव मस्के, ऍड. लेकुळे, ऍड. शेख मुद्दसीर, ऍड .सचिन पोले आदींनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم