ॲड विजय राऊत यांच्यावर हिंगोली शहर पोलिसात तिसरा गुन्हा दाखल.

 ॲड विजय  राऊत यांच्यावर  हिंगोली शहर पोलिसात  तिसरा गुन्हा दाखल.

सविस्तर माहिती अशी की 
 ॲड.विजय ग्यानबाराव राऊत यांनी पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे मागील काही दिवसापूर्वी दोन वेगवेगळे तक्रार दिल्या संदर्भांमुळे पोलीस स्टेशन हिंगोली शहर व हिंगोली ग्रामीण येथे दोन गुन्हे दाखल असून तपास सुरू आहे. 
 दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे चालू आहे, तसेच सदर गुन्ह्या संदर्भाने पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांचा कसलाही संबंध नसताना विजय राऊत यांनी श्री विकास पाटील यांच्या बद्दल  सोशल मीडियामध्ये निलंबित करण्याबाबत व इतर अर्वाची भाषेमध्ये बदनामीकारक सोशल मीडियावर  पोस्ट केल्यावरून श्री विकास पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांच्या फिर्यादीवरून विजय ग्यानबाराव राऊत यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे अब्रू नुकसानीचा व कर्तव्यात अडथळा निर्माण करीत असल्याबाबत भारतीय न्याय संहिता कलम 356 (1), 356(2) , 221 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला  तसेच एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे आज रोजी विजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वी सुद्धा विजय राऊत यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय न्याय संहिता कलम 356(1) 221 सह कलम पोलिसाची अपप्रीतीची भावना पसरविण्यास प्रतिबंधक अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ॲड 
विजय ज्ञानबा राव राऊत  यांच्यावर यापूर्वी  पोलिसात गुन्हे दाखल आहेत.

Post a Comment

أحدث أقدم