राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर 2024 हिंगोली जिल्हा राज्यात प्रथम 11 ऑक्टोबरला मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुंबईत बक्षीस वितरण


राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर 2024  हिंगोली जिल्हयाचा राज्यात प्रथम  11 ऑक्टोबरला मंत्री आदिती तटकरे  यांच्या हस्ते बक्षीस वितरण 
 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
9 ऑक्टोंबर 2024 
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत देशामध्ये दरवर्षी 01 सप्टेंबर ते 31 सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणुन साजरा करण्यात येत असतो. मा.आयुक्त एबाविसेयो मुंबई यांच्या सुचनेनुसार सन 2024 मध्ये माहे सप्टेंबर या महिन्यामध्ये ठरवुन दिलेल्या उपक्रमानूसार महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पंचायत विभाग ई. यांच्या समन्वयाने सर्व अंगणवाडी केंद्र, बिट व प्रकल्प स्तरावर विविध उपक्रम घेण्यात येऊन, त्याच्या ऑनलाईन नोंदी जन आंदोलन डॅश बोर्डवर करण्यात आल्या आहेत.
मा.उप आयुक्त एबाविसेयो मुंबई यांचे पत्र क्रं. 5774 दिनांक 09.10.2024 अन्वये विविध उपक्रम राबवुन केंद्र शासनाच्या सुचनेनुसार जन आंदोलन डॅश बोर्डवर उपक्रमाच्या यशस्वी नोंदी करुन हिंगोली जिल्हयाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला असल्याने मा. ना. श्रीमती अदिती तटकरे मंत्री महिला व बाल विकास विभाग यांच्या हस्ते दिनांक 11.10.2024 रोजी मुंबई येथे सत्कारासाठी श्री. अभिनव गोयल जिल्हाधिकारी हिंगोली, श्रीमती नेहा भोसले मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली, श्री. गणेश वाघ उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक), जिल्हा परिषद, हिंगोली यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यापुर्वीही हिंगोली जिल्हयात महिला व बालकल्याण विभागाने लाभार्थ्याचे आधार व्हेरीफिकेशन, अंगणवाडी केंद्राचे एकसमान रंगरंगोटी, धुरमुक्त अंगणवाडी अभियान, पोषण ट्रॅकर व पोषण अभियान या सारख्या विविध उपक्रमांध्ये मागील काही वर्षामध्ये विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केलेले • आहेत,

Post a Comment

أحدث أقدم