अनैतिक संबंधातून खून केल्या प्रकरणातील आरोपीची जामीन मंजूर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
8 ऑक्टोबर 2024
प्रकरणातील
सविस्तर माहिती अशी की
दि. 03जून 2024 रोजी सकाळी 07:30 वा सु. मासोड फाटा कळमनुरी येथील शेतामध्ये नामदेव तुकाराम मिरासे यांचा मृतदेह आढळला होता तरी मयतचे भाऊ यांनी पो. स्टे. कळमनुरी येथे दिली की,मयतच्या पत्नीने तिच्या प्रेयसी सोबत मिळून नामदेव मिरसे यांचा खून केला या आरोपावरून पो. स्टे कळमनुरी येथे गुर नं. 279/2024 , भा.दं.वि . चे कलम 120 (ब ), 302 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता.
सदर प्रकरणामधील अटक आरोपी दीपक उर्फ मोतिराम धवसे यांनी ॲड अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत वि. जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे नियमित जामिन साठी अर्ज दाखल केला होता.
सदर प्रकरणामध्ये वि. मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री आर. व्ही लोखंडे यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून दि. 03/10/2024 रोजी आरोपीची जामिन मंजूर केली आहे.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق